MLA Vaibhav Naik , MP Narayan Rane , Uddhav Thackeray , Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

सुपारी बाज नारायण राणेंची 'ती' गर्जना शिवसैनिकांनी ठरवली फाेल : आमदार वैभव नाईक

राणेंनी वही पेन घेऊन बसावं असं जोरदार प्रत्युत्तर वैभव नाईक यांनी दिलं आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : नारायण राणेंनी (Narayan Rane) याआधी किती सुपाऱ्या दिल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) माहीत आहे. राणेंच्या पुत्राने सुद्धा सुपारी देऊन शिवसैनिकावर (Shivsainik) हल्ला केलेला. सुपारीबाज राणेंनी आमच्या नेत्यांवर (पक्षप्रमुख उद्धव ठाकरे) आरोप करणे चुकीचे आहे असं आमदार वैभव नाईक यांनी नमूद केले. (MLA Vaibhav Naik News)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जीवे मारण्याचा आराेप केला. त्यावर आमदार वैभव नाईक म्हणाले राणेंनी शिवसेना सोडताना सोबत असलेले आमदार घरी बसले. राणेंना त्यांना मारण्याची सुपारी कोणी दिली हे माहीत असेल तर ते त्यांनी पोलिसांना, सीबीआयला सांगितलं पाहिजे हाेते. जर कोणाचा खरोखरच सहभाग असेल तर निश्चितपणे कारवाई होईल.त्याला शिवसेनेचा विरोध असण्याचे कारण नाही.

राणेंच्या मुलाने दिघे आणि बाळासाहेबांबद्दल काय उदगार काढले होते ते लोक विसरले नाहीत. राणेंच्या बोलण्याकडे फडणवीस व मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) सुद्धा लक्ष देत नाही. शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केलेल्यांची राणेंनी मुलाखत घ्यायला हवी. कारण बंडखोरी केल्यानंतर काय होत हे राणेंना उत्तम माहीती आहे.

आमदार नाईक पुढं म्हणाले उध्दवजींवर आरोप करून राणेंनी बंडखोरी केली होती. त्यांची बंडखोरी मंत्रीपदासाठी आणि मुलांच्या पुनर्वसनासाठी होती. बंडखोरी केल्यानंतर शिवसेना औषधाला ही ठेवणार नाही अशी गर्जना करणाऱ्या राणेंचा त्याच शिवसैनिकांनी पराभव केला. चालू राजकीय घडामोडीत राणेंचे अस्तित्व शून्य आहे. त्यामुळे स्पर्धेत यायला राणेंची ही टीकेची भूमिका. राणेंचा भाजपने (BJP) वापर करून घेतला.

उध्दवजींनी सन्मानाने मुख्यमंत्री पदावर लाथ मारली. उद्धवजी आणि आदित्य यांच्या दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो हे सिंधुदुर्गात (Sindhudurg) लवकरच कळेल. राणेंनी वही पेन घेऊन बसावं असं जोरदार प्रत्युत्तर वैभव नाईक यांनी दिलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DIG च्या मुलीनं आयुष्याचा दोर कापला, AIIMS नागपूरमध्ये घेत होती शिक्षण

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांचा मृत्यू

Shreya Ghoshal Concert: श्रेया घोषालच्या कॉन्सर्टवेळी चेंगराचेंगरी; स्टेजजवळ हाणामारी, दोघे बेशुद्ध; पाहा VIDEO

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकला, जालना हादरलं

SCROLL FOR NEXT