mla santosh bangar, hingoli  saam tv
महाराष्ट्र

Breaking News : बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या आमदारानं पीक विमा कार्यालय फाेडलं; शेकडाे कार्यकर्ते दाखल

आमदार बांगर यांनी कृषी अधिकाऱ्यांना देखील कार्यालयात बसून ठेवले होते.

संदीप नागरे

Santosh Bangar : बाळासाहेबांची शिवसेना (balasahebanchi shivsena) या गटाचे आमदार संतोष बांगर (mla santosh bangar) यांनी आज (गुरुवार) पिक विमा कंपन्याचे कार्यालय फाेडले. आमदार बांगर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली शहरातील एनटीसी परिसरात असलेल्या पिक विमा कंपनीच्या कार्यालयातील साहित्याची केली तोडफोड केल्याची प्राथमिक मिळत आहे. (Breaking Marathi News)

या घटनेपुर्वी आमदार संतोष बांगर हे शहरातील पिक विमा कंपनीच्या कार्यालयाचा शोध घेत हाेते. पिक विमा कंपनीचे प्रतिनिधीच्या शाेधात ते हाेते. हे प्रतिनिधी शेतक-यांना वेळेत भेटत नाहीत, ते सापडत नसल्यामुळे बांगर संतापलेले हाेते. त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना देखील कार्यालयात बसून ठेवले होते. (Santosh Bangar Latest Marathi News)

आमदार बांगर हे हिंगोली शहारातील एनटीसी परिसरात पाेहचताच पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी गायब असल्याची चर्चा हाेती. आमदार बांगर कार्यालयात पोहचले. तेथे त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ताेडफाेड केली. त्यानंतर शेकडो शेतकऱ्यांचा जमाव घेऊन आमदार संतोष बांगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

SCROLL FOR NEXT