Sanjay Gaikwad , Buldhana saam tv
महाराष्ट्र

राजकारण तापलं ! 'तुमच्या बापानं शेकाेट्या पेटवल्या नाही, तुम्ही काय महाराष्ट्र पेटवणार'

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज पुन्हा ठाकरे गटातील समर्थकांना दिलं चॅलेंज.

संजय जाधव

Sanjay Gaikwad : ज्यांच्या बापानं कधी शेकाेट्या पेटविल्या नाहीत ते महाराष्ट्र पेटविण्याची भाषा करीत आहेत. ज्यांनी कधी थप्पड मारली नाही ना खटमल मारलं. तुम्ही काय करणार बघूनच घेताे. आम्ही ठरवलं असतं तर त्याच दिवशी दाेनशे तीनशेंचा बंदाेबस्त झाला असता. ज्यांना ... आली असेल त्यांनी या त्याची व्यवस्था करताे मी असा प्रहार व इशारा आमदार संजय गायकवाड (sanjay gaikwad) यांनी उद्धव ठाकरे गटाच्या समर्थकांना आज पुन्हा एकदा (buldhana) दिला आहे. (Buldhana Latest Marathi News)

आमदार गायकवाड यांनी नुकतेच चून चून के मारेंगे अशी धमकी ठाकरे गटास अप्रत्यक्ष दिली हाेती. त्यास ठाकरे गटानं प्रत्युत्तर देताना आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत. आमच्या नादाला लागू नकोस असं उत्तर दिलं हाेते. तसेच बुलढाणा येथील काही नेत्यांनी आमदार गायकवाडांना चॅलेंज देखील दिलं. त्यावर आज आमदार गायकवाड यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना समज वजा एक प्रकारे धमकीच दिली.

आमदार गायकवाड म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असाे अथवा आमचे अन्य नेते त्यांच्यावर जिल्ह्यात हाेणारी टीका आम्ही सहन करणार नाही. त्या दिवशी आमचे कार्यकर्ते त्यांना भारी पडले असते पण आम्हांला तंटा नकाे हाेता, लक्षात आलं का. ज्यांना खूमखूमी आहे त्यांना आमचे कार्यकर्ते उत्तर देतील.

मी मैदानातील मर्द माणूस आहे. तलावारी, अंगावर झेललाे आहे तुम्ही काय केलं. पस्तीस वर्ष संघर्ष केला आहे मी. विनाकारण डिवचू नका. आम्हांला सत्तेचा माज आलेला नाही. जातीची परवानगी घेतली हाेती आम्हांला बाेलताना असंही आमदार गायकवाड म्हणाले. आम्ही जात पात मानत नाही असेही गायकवाडांनी स्पष्ट केले.

माझ्या वक्तव्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून बुलढाणा जिल्ह्यात येथे काही ठिकाणी माेर्चा निघाले. ते मी पाहिलं काही ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक हाेते. त्याला माेर्चा म्हणावे का असा प्रश्न मला पडला. तुम्ही तक्रार देत नाही आणि पाेलिसांकडून कारवाईची मागणी करता. जालिंदर भुजबळ यांस जिल्हा परिषद उपाध्यक्षपद मी दिलं. कृषी उत्पन्न समितीवर संचालक केले. ज्यावेळेस त्यांना माजी आमदार मारायला जात हाेते त्यावेळी मी त्यांना वाचविण्यास जात असे असे गायकवाडांनी नमूद केले.

आमच्या बद्दल बोलेल त्याला चोपणारच. माझ्यावर १५० केसेस, ०४ वेळा तडीपार झालो, MPDA सुद्धा लागला, माझ्या नादी लागू नका असेही आमदार गायकवाड यांनी नमूद केले. ते म्हणाले बाळासाहेबांच्या एका शब्दाला आम्ही मरायला तयार असायचाे. त्यामुळं कूठं यायचे, कधी यायचे ते सांगा असं आव्हान आमदार गायकवाडांनी ठाकरे गटाच्या समर्थकांना दिले.

दरम्यान आमदार गायकवाड यांनी खासदार नवनीत राणांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला असेल तर त्यास त्यांचे कार्यकर्ते उत्तर देतील. प्रत्येक गाेष्टींसाठी आम्हीच कशासाठी असे एका प्रश्नावर नमूद केले. ते म्हणाले ज्याने त्याने आपआपलं बघावं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT