Sanjay Gaikwad Assaults Canteen Staff Over Food, Video Goes Viral  Saam Tv News
महाराष्ट्र

CM Fadnavis: संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

CM Fadnavis Says Police will take action: निकृष्ट अन्नामुळे संतापलेले आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये घुसून कामगाराला मारहाण केली. घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, अद्याप गुन्हा दाखल न झाल्यामुळे संताप व्यक्त होतोय.

Bhagyashree Kamble

निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं गेल्याच्या कारणावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कामगाराला मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. दरम्यान, या घटनेला दोन दिवस उलटूनही संजय गायकवाड यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या घटनेबाबत बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी कुठलाही पश्चाताप व्यक्त केलेला नाही. उलट, त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर, आपण काही चुकीचं केलं नसल्याचा दावा केला. दरम्यान, संजय गायकवाड प्रकरणात गृहराज्यमंत्र्यांनी अद्याप कोणतीही तक्रार आली नसल्याचं सांगितलं. गायकवाड यांच्यावर कारवाई होणार की नाही? असा प्रश्न प्रसारमाध्यमांमधून उपस्थित करण्यात आला, यावर फडणवीस यांनी, योग्य कारवाई केली जाईल, असं म्हटलंय.

संजय गायकवाडप्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'निश्चितच पोलिसांकडून चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करतील. याच्या करिता तक्रार दाखल करण्याची आवश्यकता नाही. जर दखलपात्र गुन्हा जर होत असेल तर, त्यासंदर्भात पोलीस योग्य कारवाई करतील', असं फडणवीस म्हणाले.

त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी मंगळवारी रात्री कॅन्टीमधून जेवण मागवले होते. डाळभात,चपाती, भाजी, असा साधा मेन्यू त्यांनी मागवला होता. त्यांनी हे जेवण खोलीत मागवलं होतं. जेवणातून उग्र वास येत असल्यामुळे त्यांना संताप अनावर झाला. त्यांनी थेट कॅन्टीन गाठलं. वेल आणि बनियनवर पोहोचत कॅन्टीनच्या वाढप्यांवर हल्ला केला.

लाथाबुक्क्यांनी तुडवलं, शिव्या घातल्या, तसेच ठोशानं तोंड फोडलं. हा प्रकार घडत असताना एकाने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ शूट केला. या घटनेनंतर विरोधकांनी संजय गायकवाड यांच्यावर टीकेची तोफ डागली. आमदार संजय गायकवाड यांच्यावर हाणामारी, शिवीगाळ, धमक्या देणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामनातून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

SCROLL FOR NEXT