Sanjay Gaikwad Saam tv
महाराष्ट्र

शिंदेंच्या आमदाराची गुंडगिरी कधी थांबणार? छत्रपती शिवरायांचा आदर करताना जीभ घसरली, ऑडिओ क्लिप व्हायरल

Sanjay Gaikwad viral audio clip news : छत्रपती शिवरायांचा आदर करताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली आहे. दिवगंत गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरुन आमदार गायकवाड यांनी थेट प्रकाशकाला शिवीगाळ केल्याचे समोर आलं आहे.

Vishal Gangurde

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात

आमदार संजय गायकवाड यांची प्रशांत आंबी यांना शिवीगाळ

आमदार गायकवाड आणि आंबी यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

बुलढाणा : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कोल्हापूरचे कॉम्रेड प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. बुलढाण्यातील एका लग्नात आंबी यांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तक वाटल्याने संजय गायकवाड संतापले. गोविंद पानसरेंचे काय झालं माहिती आहे ना? तुझी जीभ छाटून टाकीन, अशा शब्दात गायकवाड यांनी आंबी यांना धमकावलं. दोघांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून राज्यात खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी थेट प्राध्यापक गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवीगाळ केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचं अनादर करणारे शीर्षक या पुस्तकाला दिल्याचे म्हणत आमदार गायकवाड यांनी आंबी यांच्यावर शिवीगाळ केली. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप कधीची आहे, याबद्दल स्पष्टता नसली तरी या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही. सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

संजय गायकवाड काय म्हणाले?

व्हायरल ऑडिओ क्लिपवर संजय गायकवाड म्हणाले, 'व्हायरल ऑडिओ क्लिप मोडून तोडून तयार करण्यात आली आहे. माझ्या पत्नीला २१ एप्रिल रोजी 'शिवाजी कोण होता' हे पुस्तक देण्यात आलं होतं. तिने पुस्तक घरी आणल्यानंतर मी वाचलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला छेडछाड करण्याचा प्रयत्न झालाय. प्रत्येक पानावर छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. महाराजांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्हाला सहन होत नाही. तो सारखा सारखा डिवचत होता, त्यामुळे मी त्याला शिव्या हासडल्या. महाराष्ट्रात आम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले; प्रति तोळ्यामागे इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Aishwarya Narkar Video: तुमचीही फसवणूक होऊ शकते! अभिनेत्री ऐश्वर्या नारकर असं का म्हणाली? Video पाहून धक्का बसेल

Maharashtra News Live Update: पश्चिम बंगालच्या मुर्शिराबादमध्ये मतदानादरम्यान दगडफेक

Hair Cut Tips : पार्लरला जायला वेळ नाही? घरीच कापा 'असे' केस, १० मिनिटांत मिळेल सुंदर लूक

Maida Side Effects: 21 दिवस मैद्याचे पदार्थ न खल्ल्याने शरिरात होतात हे ७ हेल्दी बदल

SCROLL FOR NEXT