Rohit Pawar slams government after violent attack by windmill mafia in Dharashiv Saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

Rohit Pawar slams Home Ministry: बीड, सांगलीनंतर धाराशिवमध्ये तयार होणारा तिसरा आका कोण? महाराष्ट्राचा गृहखातं या आकाच्या मुसक्या का आवळत नाही ? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केलाय.

Bharat Jadhav

  • धाराशिवच्या भूम तालुक्यात पवनचक्की कंपनीवर तलवारी व शस्त्रांनी हल्ला झाला.

  • कर्मचाऱ्यांना मारहाण करत वाहनांची तोडफोड करण्यात आली.

  • रोहित पवारांनी एक्सवर ट्वीट करत सरकारवर गंभीर आरोप केले.

  • ‘नवा आका कोण?’ असा सवाल करत गृहखात्याच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला.

धाराशिवमधील पवनचक्की कंपनीत झालेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर रोहित पवार संतापले आहेत. खंडणीसाठी धाराशिवच्या भूम तालुक्यात पवनचक्की माफीयांचा धुमाकूळ घालत आहेत. तलवारी, लोखंडी साखळ्या, धारदार शस्त्रांनी पवनचक्की कंपनीतील वाहनांची तोडफोड केली होती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना काही दिवसापूर्वी समोर आली होती. त्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला धाराशिवमधील नवा आका कोण? असा सवाल केलाय. ( Rohit Pawar Questions Dharashiv Windmill Mafia Violence: Who Is The New 'aaka'?)

बीड आणि सांगलीनंतर धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? असा संतप्त सवाल रोहित पवारांनी तोडफोडीच्या घटनेनंतर केलाय. रोहित पवार यांनी एक्स या सोशल माीडिया प्लॅटफॉर्मवर ट्वीट करत सरकारला जाब विचारलाय. महाराष्ट्रात राजकीय आश्रय मिळत असल्याने आकांची साखळी तयार होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. महाराष्ट्राचा गृहखातं या आकाच्या मुसक्या का आवळत नाही? असा सवाल रोहित पवार यांनी X माध्यमावर ट्विट करत केलाय.

काय केलंय ट्विट

'महाराष्ट्रात राजकीय आश्रय मिळत असल्याने आकांची साखळी तयार होतेय.पूर्वी पुण्यात दहशत माजवणाऱ्या एका आकाने पोलिसांच्या नाकावर टिच्चून थेट धाराशीवपर्यंत मजल मारलीय.त्याच्या टोळीने धाराशीवमध्ये पवनचक्की कंपनीच्या गाड्यांची तोडफोड करून धुमाकूळ घातलाय.कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत दहशत माजवलीय.

त्याच्या दहशतीमुळं कुणी तक्रार करायलाही पुढं येत नाहीये. बीड आणि सांगलीनंतर आता धाराशीवमध्ये तयार होणारा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? आणि गृहखातं या आकाच्या मुसक्या का आवळत नाही? असा सवाल त्यांनी ट्विटमधून केलाय.

दरम्यान कंपनीच्या वाहनांचे फोटो पोस्ट करताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्री महोदय, पुलीस की इज्जत का सवाल है! कधी आवळताय या नवीन आकाच्या मुसक्या? 'असं कॅप्शन दिलंय. दरम्यान भूम तालुक्यातील पाथरूडजवळील दुधोडी फाटा येथे खाजगी पवनऊर्जा प्रकल्प आहे. गुरुवारी रात्री येथे काही अज्ञातांनी हल्ला केला. पवनचक्की कंपनीच्या अकरा वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच काही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT