Surabhi Jayashree Jagdish
मुघल हरम हा मुघल बादशाहांच्या कुटुंबातील स्त्रियांसाठी सुरक्षित जागा मानली जात असे. या हरममध्ये शेकडो दासी तसंच महिला सैनिक राहत असत. त्यामुळे हा परिसर स्त्रियांसाठी वेगळा आणि संरक्षित मानला जात होता.
काही शासकांच्या काळात मुघल हरममध्ये कठोर नियम लागू केले जात. स्त्रियांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवलं जात असे. त्यामुळे हरममध्ये शिस्त आणि बंदिस्त वातावरण निर्माण झाले होते.
खरं तर मुघल हरममध्ये स्त्रिया सुरक्षित मानल्या जात होत्या. मात्र काही शासकांच्या काळात हरममधील स्त्रियांवर अत्याचार सुरू झाले
मुघल बादशाह जेव्हा दुसऱ्या महालात किंवा शिकारीला जात असत तेव्हा काही सैनिक दासींवर अत्याचार करीत. ही परिस्थिती स्त्रियांसाठी अत्यंत भयावह ठरली.
हळूहळू स्थिती इतकी बिकट झाली की तहखान्यात किंवा अंधाऱ्या खोलीत नेऊन स्त्रियांवर घृणास्पद कृत्यं केली जात. या घटनांनी हरममधील स्त्रियांचे जीवन असुरक्षित झाले. त्यांना सतत भीतीचा सामना करावा लागत होता.
ज्यावेळी या दासी हरम सोडून पळून जात असत, तेव्हा त्यांची तपासणी केली जात असे. तपासणीनंतर त्यांना पुन्हा पकडून मुघल बादशाहांसमोर आणले जात असे. त्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य पूर्णपणे हिरावलं जात होतं.
सैनिक आणि सेनापती एकत्र येऊन स्त्रियांनाच दोषी ठरवत असत. त्यानंतर त्यांना एका कोठडीत नेऊन अनेक यातना दिल्या जात.