ED Summons To Rohit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Rohit Pawar: अरविंद केजरीवालांसारखी कारवाई माझ्यावरही होईल; रोहित पवारांचा गंभीर आरोप

MLA Rohit Pawar News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखी कारवाई माझ्यावरही करतील, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Satish Daud

MLA Rohit Pawar Latest News

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखी कारवाई माझ्यावरही करतील, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. खरी भूमिका घेतल्याने माझ्यावर कारवाई झाली, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. भाजपच्या कोअर कमिटीत माझ्यावरील कारवाईबाबत चर्चा झाली, असा दावा देखील आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

भाजपच्याच लोकांनी मला याबाबत माहिती दिल्याचंही रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितलं आहे. रोहित पवार यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर भाजपक़डून सुडबुद्धीने कारवाई केली जातेय का? असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीकडून कारवाई करण्यात आली. कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला. या कारवाईनंतर रोहित पवार सातत्याने भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर टीकेचा भडीमार सुरु केला आहे.

'अरविंद केजरीवालांसारखी माझ्यावरही कारवाई होईल'

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार सोमवारी (ता. २२) इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी तेथील मतदारांसोबत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. "माझ्यावर कारवाई होणार हे मला माहीत होतं. मात्र ते माहित असतानाही मीही भूमिका घेतली कारण ती खरी भूमिका घेणं फार महत्त्वाचं होतं", असं रोहित पवार म्हणाले.

"आमच्यावर बऱ्याच कारवाया झाल्या असून आणखीही होणार आहेत. लोकसभा झाल्यानंतर कदाचित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखे देखील माझ्यावर कारवाई केली जाईल, असं काही भाजपच्याच लोकांनी मला सांगितले आहे. मात्र, आम्ही त्यास घाबरत नाही. असं रोहित पवार यांनी ठामपणे सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT