cm and devendra fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

'फडणवीस CM असताना राज्यात शांतता हाेती, 'मविआ' आल्यापासून दंगे वाढले'

अमरावतीत पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा दावा आमदार रवी राणा यांना केला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात एकदाही दंगा झाला नाही. राज्यात सर्वत्र शांतता हाेती. महाविकास आघाडी (mva) सरकार आल्यापासून सातत्याने दंगे हाेताहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच अमरावतीत (amravati) झालेल्या घटनांसाठी पालकमंत्री यांचे हे अपयश असल्याची टीका आमदार रवी राणा (ravi rana) यांनी केली आहे. (mla ravi rana latest marathi news)

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर (achalpur) व परतवाडा (paratwada) परिसरात संचारबंदी लागू आहे. या पार्श्वभुमीवर आमदार राणा बाेलत हाेते. ते म्हणाले यापुर्वी अमरावती शहरात आणि त्यानंतर अचलपूर परिसरात दंगल झाल्याने अमरावतीला गालबोट लागले आहे. राज्यासह देशभरात अमरावतीची वेगळी ओळख असताना अमरावतीचे नाव खराब होत आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन शांततेचा आवाहन केले पाहिजे.

दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून राज्यात दंगे सुरु झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशाेमती ठाकूर यांचे हे अपयश आहे असे आमदार राणांनी नमूद केले.

ते म्हणाले अमरावतीत पोलिसांवर राजकीय दबाव आहे. त्यामुळेच अमरावतीत अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. अमरावतीच्या पालकमंत्री यांच्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT