अमर घटारे, साम टीव्ही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आणि दोन गट तयार झाले. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बंडाला आपलं समर्थन दिलेलं नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाकडून वारंवार शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाले. तिथे अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली.
शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार अचानक दिल्लीला गेल्याने राज्याच्या राजकारणात उलटसूलट चर्चा सुरू झाल्या. शरद पवार (Sharad Pawar) भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला. अशातच अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केला.
भाजपसोबत येण्यासाठी अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांची मनधरणी केली जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठी राजकीय घडामोड घडेल, शरद पवार भाजपसोबत येऊन राज्यात मजबूत सरकार स्थापन करतील, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.
इतकंच नाही, तर आगामी काळात काँग्रेसचे अनेक नेते मोदीना पाठींबा देतील. तसेच विरोधी पक्षात कमी लोक राहतील, असा दावाही देखील रवी राणा यांनी केला आहे. दरम्यान, रवी राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शरद पवार काय निर्णय घेणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.