mla ranjit kamble demands maharashtra government to help soyabean growers saam tv
महाराष्ट्र

Wardha: पीक विमा न काढलेल्या साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारने विचार करावा : आमदार रणजित कांबळे

पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे दावे विमा कंपनीने फेटाळल्याने शेतकरी हवालदिल झालेत.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Unseasonal Rain Hits Wardha :

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे देवळी पुलगाव मतदार संघातील सर्व गावांत शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. तत्पूर्वी खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या सोयाबीन पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले होते. आता पुन्हा एकदा अवकाळीच्या अवकृपेने झालेल्या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करावे, अशी मागणी आमदार रणजित कांबळे (mla ranjit kamble) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली. (Maharashtra News)

आमदार कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात खरीप हंगामात शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. सोयाबीन नुकसानीचे सर्वेक्षण करून शासनाला अहवालसुद्धा पाठविण्यात आला आहे. मात्र काही प्रमाणात पीक विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळाली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे दावे विमा कंपनीने फेटाळले आहे.

दुसरीकडे ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही त्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीसंदर्भात अद्यापपर्यंत कोणतेच आदेश देण्यात आले नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेली कपाशी व तुरीच्या पिकाचे नुकसान होत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांना सद्यस्थितीत या संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे तत्काळ सर्वेक्षण करून मदत द्यावी, अशी मागणी आमदार रणजीत कांबळे यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: पैशाचे व्यवहार टाळा; ५ राशींच्या व्यक्तींसाठी प्रियकराकडून मिळेल खास भेट; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीचे महत्त्वाची बैठक पार पडली

Pollution Alarm: पुणेकरांच्या फुफ्फुसात विषारी धूळ; हवेत दर तासाला मिसळलं जातंय 6 टन सिमेंट

EPFO चा ऐतिहासिक निर्णय; आता UPI द्वारे पीएफ काढता येणार?

husband wife clash : पतीचा फोन हिसकवाल तर जेलमध्ये जाल? तक्रार केल्यास 3 वर्षांची शिक्षा, दंडही लागणार?

SCROLL FOR NEXT