MLA Rajan Salvi , Ratnagiri , shivsena, nitesh rane, nilesh rane, narayan rane saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena News : 'आमच्या अंगावर काेण आला तर आम्ही त्याला शिंगावर घेताेच, हीच शिवसेनेची स्टाईल'

आमदार साळवी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

अमोल कलये

Shiv Sena News : अंगावर आल्यानंतर शिंगावर घ्यावाच लागतं ही भूमिका आमची (शिवसेनेची) आहे. कुणी अंगावर आला तर शिंगावर घेऊ असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी विराेधकांना रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात माध्यमांशी बाेलताना दिला. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बालेकिल्ला कायम राखल्याबद्दल आमदार साळवींनी विविध ग्रामपंचायतीस भेट देत मतदारांचे आभार मानले. (Ratnagiri Latest Marathi News)

दिवाळी सण (diwali festival) जवळ आला असतानाही सध्या काेकणात राजकीय शिमगा पाहयला मिळत आहे. काेकणातील नेते खालच्या पातळीवर टीका करीत आहेत यावर तुम्हांला काय वाटतं असा प्रश्न शिवसेना नेते राजन विचारे यांना माध्यमांना विचारला. त्यावर विचारे म्हणाले देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रातील जनतेने राज्याची वाटचाल पाहिली आहे. या वीस वर्षात राजकीय स्थितीतून आराेप प्रत्याराेप करणं हे सगळं चुकीच्या पद्धतीने चालले आहे. (Breaking Marathi News)

आमदार साळवी म्हणाले नितेश राणे हे आमचे विरोधक आहेत. राणे कुटुंब हे बाळासाहेबांच्या वलयामुळे मोठे झालं. त्यांनी माझ्यावर आराेप करणे हे चुकीचे आहे. मी पक्षप्रमुखांशी, पक्षाशी किती एकनिष्ठ आहे हे त्यांनी सांगणे गरजेचे नाही. मी असं म्हणेन की अंदर की बात है, ये राणे कुटुंब हमारेही साथ है असे साळवी यांनी नमूद केले. (MLA Rajan Salvi Latest Marathi News)

भास्कर जाधव हे शिवसेनेचे आक्रमक नेते आहेत. जे त्यांच्या मनात, हृदयात तेच त्यांच्या ओठावर येतं. भास्कर जाधव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा उत्तर देण्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते सक्षम आहेत असेही साळवींनी (rajan salvi) नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अमरावती जिल्ह्यातील काय स्थिती, कुणाला आघाडी?

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT