- जितेश कोळी
MNS Leader Vaibhav Khedekar : मनसेचे (mns) नेते वैभव खेडेकर (vaibhav khedekar) पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणात खेडेकर यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्या (शुक्रवार) खेडेकर यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर खेड न्यायालयात सुनावणी हाेणार आहे. (Ratnagiri Latest Marathi News)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यावर धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी न घेता गणेशोत्सवात लॉटरी काढल्याचा आराेप आहे. त्याबाबत खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी रत्नागिरीचे (ratnagiri) एलसीबी पथक सध्या वैभव खेडेकर यांचा शोध घेत आहे. (Maharashtra News)
दरम्यान वैभव खेडेकर यांनी अटकपूर्वसाठी जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर खेड (khed) न्यायालयात (court) उद्या (शुक्रवार) सुनावणी होणार आहे. दरम्यान काल रात्री पासून पोलिसांनी वैभव खेडेकर यांचा शोध घेण्यासाठी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे चौकशी सुरू केली आहे. अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर न झाल्यास वैभव खेडेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.