MLA Demands Action Saam Tv News
महाराष्ट्र

मला xxx काढता का? तुमचा माज...; अजित दादांच्या आमदाराची जीभ घसरली, नेमकं घडलं काय?

MLA Demands Action: कळवण येथे आमदार नितीन पवार यांचे तब्बल पाच तासांचे ठिय्या आंदोलन. आश्रमशाळांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या भरतीसह जेवण व सुविधा संदर्भात मागण्या.

Bhagyashree Kamble

आश्रमशाळांमधील समस्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांनी २८ जुलै रोजी कळवण येथे एकात्मिक प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तब्बल पाच तास आंदोलन करूनही जबाबदार अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं नितीन पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

आंदोलनादरम्यान, उपस्थित अधिकाऱ्यांना उद्देशून त्यांनी, 'तुम्हाला एवढा माज आलाय का? तो माज मी उतरवतो'. यावेळी त्यांच्या तोंडून असभ्य शब्दही निघाले होते, यावेळी त्यांची जीभ घसरली.

त्यानंतर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनाही फटकाले. 'मटका, २ नंबरचे धंदे, इथे खपवून घेतले जाणार नाही. सगळे अवैध धंदे बंद व्हायला हवेत', असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. तसेच आश्रमशाळेला जोपर्यंत शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत शाळा बंदच ठेवा, असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

शासकीय आश्रमशाळांना टाळे ठोकण्याचा इशारा

कळवण आणि सुरगणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा गंभीर अभाव आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प झाले आहे. शाळा सुरू होऊन २ महिने उलटले तरीही शिक्षक नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आमदार पवार यांनी पालकांना आपल्या मुलांना शाळेतून घरी घेऊन जाण्याचे आवाहन केले आणि प्रशासनाला 'शिक्षक नसतील तर शाळांना टाळे ठोका', असा रोखठोक इशारा दिला.

प्रमुख मागणी कोणती?

आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा, बाह्यस्त्रोत शिक्षकांची अद्याप न झालेली भरती, जेवणाच्या निकृष्ट दर्जाचा प्रकार, तसेच अन्य मूलभूत सुविधांचा अभाव या प्रमुख मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटे सभागृहात किती वेळ रम्मी खेळत होते? रोहित पवारांनी वेळेचा आकडाच सांगितला|VIDEO

Rajnikanth News : रजनीकांत वर्तमानपत्र उचलायला वाकले अन् तोंडावर आपटले; चाहत्यांची चिंता वाढली

ITR 2025: आयटीआर ३ फॉर्म आता ऑनलाइन पाहता येणार, आयकर रिटर्न भरण्याची सोपी पद्धत काय? वाचा...

Maharashtra Tourism: नैसर्गिक सौंदर्य अन् नयनरम्य परिसर... धुळे जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं कधी पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

SCROLL FOR NEXT