- अमर घटारे
Nitin Deshmukh Sangharsh Yatra News : सरकार माझ्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे. यात पोलिसांचा काही दोष नाही. पाेलिसांवर सरकारचा दबाव आहे. मला आता पोलिस कुठे घेऊन जाताहेत ते माहित नाही. आगामी काळात खारे पाणी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना दाखविण्यासाठी नेणार असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (mla nitin deshmukh latest news) यांनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. (Breaking Marathi News)
आमदार नितीन देशमुख (mla nitin deshmukh latest news) यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांना नागपूर पोलिसांनी (nagpur police) आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील धामना गावात स्थानबद्ध केले आहे. पाणीपुरवठा योजनेची स्थगिती उठवा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आमदार देशमुख यांची संघर्ष यात्रा जाणार हाेती. त्यापूर्वीच पाेलिसांनी आमदार देशमुखांना ताब्यात घेतले आहे.
पाेलिस आमदार नितीन देशमुख यांनी घेऊन अमरावतीच्या (amravati) नांदगाव पेठ टोल नाक्यावर दाखल झाले. आमदार देशमुख यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला असता ते म्हणाले अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुका खारपानपट्टा असल्याने पाणीपुरवठ्याच्या योजनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती द्यावी या मागणीसाठी आमचे आंदाेलन आहे.
परंतु दडपशाही मार्गाने हे आंदाेलन चिरडण्याचा प्रयत्न हाेत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे पाणी पिले नाही. त्यामुळे आठ ते दहा दिवसांत हे खार पाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घेऊन जाऊ असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.