Ahmednagar Politics Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Politics: लोकसभेला सुजय विखेंच्या विरोधात आमदार निलेश लंकेंची पत्नी रिंगणात उतरणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ahmednagar Politics: राणी लंके या सुजय विखेंच्या विरोधात लोकसभेला लढणार असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

सुशील थोरात

Ahmednagar Politics:

अहमदनगरला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके या सुजय विखेंच्या विरोधात लोकसभेला लढणार असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विखेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सध्या नवरात्र उत्सवानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याकडून महिलांना मोठा देवी यात्रा घडवली जात आहे. यानिमित्त शेवगाव-पाथर्डी मतदार संघात लावण्यात आलेल्या पोस्टरवर पहिल्यांदाच राणी लंके यांचा फोटो झळकले आहे. त्यामुळे राणी लंके या खासदारकीला उभे राहणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार निलेश लंके हे पारनेर मतदारसंघ सोडणार नसल्याने विखेंच्या विरोधात आपल्या पत्नीला लोकसभेच्या मैदानात उतरविणार असल्याच्या चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. तर या संदर्भात राणी लंके यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

'कार्यकर्त्यांच्या भावना आहे की मी खासदारकी लढवावी. तसेच त्यांच्या भावना आहे म्हणून त्यांनी माझे पोस्टरवर फोटो लावले. मात्र, पक्षाचा जो काही आदेश येईल, त्यानंतर आम्ही खासदारकी लढवण्याचं ठरवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सुजय विखे यांची प्रतिक्रिया

दरम्यान, नगरमधील राजकीय चर्चांवर खासदार सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्या विरोधात कोणी ना कोणी उभा राहणारच आहे. मात्र, भाजप महायुतीलाच यश मिळेल, असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे.

'चर्चाही सुरूच असते. मागच्या वेळी देखील शेवटपर्यंत चर्चा सुरू होती. मात्र निकालातून गोष्टी स्पष्ट होतात माझं केलेलं काम जनतेसमोर आहे. जनता त्याचे उत्तर मतदानातून देईन, असं विखे यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.57 मिळाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! वाचा संपूर्ण गणित

मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसवर CBI चा छापा! OSD वर गुन्हा दाखल, राजकारणात मोठा भूकंप

Blood sugar test: घरी ब्लड शुगर टेस्ट करताना सुई टोचल्यावर काय करावं? 'ही' 1 चूक करणं आजच थांबवा

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील तर निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Rain Alert : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, कोकणासह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान विभागाचा नेमका इशारा काय?

SCROLL FOR NEXT