Mla Narendra Bhondekar Saam tv
महाराष्ट्र

Mla Narendra Bhondekar : शिंदे गटाचा आमदार हिवाळी अधिवनेशात विधीमंडळावर मोर्चा काढणार, काय आहेत मागण्या?

Political News : नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदू बहुजन महासंघाच्यावतीने हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News :

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर हिवाळी अधिवेशनादरम्यान विधीमंडळावर मोर्चा काढणार आहेत. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदू बहुजन महासंघाच्यावतीने हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

हिंदू बहुजन समाजातील ५८ जातींच्या वेगवेगळ्या मागण्यासाठी हा मोर्चा असेल. हिंदू बहुजन महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मोर्चापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन देणार असल्याची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

नरेंद्र भोंडेकर यांनी याबाबत म्हटलं की, हिंदू समाजातील अनुसूचित जाती जमातींना अजूनही आरक्षणाचा म्हणावा तितका फायदा झाला नाही. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार म्हणावा तितका या समाजांमध्ये झालेला नाही. अद्यापही हे समाज मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. (Tajya Batmya)

हिंदू समाजातील अनुसूचित जाती जमातींना सध्याच्या आरक्षणातच विशेष दर्जा देण्याची मागणी भोंडेकर यांनी केली आहे. अजून किती वर्ष मागे राहणार. असेच होत राहीलं तर एक दिवस संघर्ष होईल. त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी अधिवेशनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Satara Tourism : कास पठाराजवळ लपलाय निसर्गाचा अद्भुत नजारा, थंडीत येथे आवर्जून जा

Crime News: बायकोसोबत अवैध संबंधाचा संशय, नवऱ्याने केली तरुणाची गळा चिरून हत्या

Rain Alert : तुळशीच्या लग्नाला पावसाची हजेरी, या जिल्ह्यांत कोसळधारेचा इशारा, जाणून घ्या सविस्तर

HBD Shah Rukh Khan : परदेशात बंगले अन् लग्जरी कार; बॉलिवूडचा 'किंग' कोट्यावधींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून डोळे विस्फारतील

SCROLL FOR NEXT