mla mahesh shinde saam tv
महाराष्ट्र

Satara: देगाव ते एमआयडीसी रस्त्याचे काम निकृष्ट; आमदार महेश शिंदे संतप्त

गेल्या ३० वर्षांपासून हा रास्त खराब असल्याने या रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी नागरिकांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली आहे.

ओंकार कदम

सातारा : साताऱ्यात (satara) औद्योगिक वसाहतीत (midc) जाणाऱ्या देगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शिवसेना आमदार महेश शिंदे (mahesh shinde) चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी स्वत: रस्त्याच्या कामाची जागेवर जाऊन पाहणी करुन बांधकाम अधिकाऱ्यांना झापले. (mla mahesh shinde latest marathi news)

बाराशे मीटर रस्त्यासाठी तब्बल सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देखील हे काम निकृष्ट होत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. रस्त्याचे काम करणाऱ्या इंजिनिअरचे आणि ठेकेदारांच साटेलोटे असल्याचा आरोप करत संबंधित इंजिनिअर आणि ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस देण्याची मागणी आमदार महेश शिंदेंनी केली आहे.

यावेळी स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. गेल्या ३० वर्षांपासून हा रास्त खराब असल्याने या रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी नागरिकांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालवण बाजारपेठेत आग लावून सलूनचे दुकान जाळले.

ओव्हरटेकवरून वाद... नंतर रागाने पाहिलं, नागपूरात अभियांत्रिकी विद्यार्थ्याची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या

Albattya Galbattya Natak: कल्याणच्या नाट्यगृहाची अवस्था पाहून कलाकार संतापले; 'अलबत्या गलबत्या' कलाकारांचा व्हिडिओ व्हायरल

Thane Politics : ठाण्याच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, कारण काय?

Kalyan Crime: पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कल्याणमधील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT