satara , mla mahesh shinde, mlc shashikant shinde  saam tv
महाराष्ट्र

Mahesh Shinde Vs Shashikant Shinde : जिहे कटापूरच्या पाण्यावरून राजकारण पेटलं; शशिकांत शिंदे sholay तील असरानी, महेश शिंदेंचा टाेला

आज आमदार महेश शिंदेंनी साता-यात पत्रकार परिषद घेत आमदार शशिकांत शिंदेंवर टीका केली.

ओंकार कदम

Satara Latest News : कोरेगाव तालुक्यातील भागांमध्ये असलेल्या पाण्याच्या दुष्काळावरून कोरेगाव तालुक्याचे वातावरण चागलंच तापलं आहे. साेमवारी आमदार शशिकांत शिंदेंनी (mla shashikant shinde) आमदार महेश शिंदेंवर टीका करत आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावर आज प्रत्युत्तर देत आमदार महेश शिंदेंनी (mla mahesh shinde latest news) शशिकांत शिंदे यांची तुलना शोले पिक्चरमधील अभिनेते असरानी यांच्याशी केली आहे.

आमदार महेश शिंदे म्हणाले शशिकांत शिंदेंना सध्या आंदोलन करण्याशिवाय दुसरा उद्योगच काय आहे. त्यांची अवस्था शोले पिक्चर मधील असरानी सारखी झाली आहे. आधे इधर आधे उधर आणि बाकी मेरे पीछे आओ असं त्यांचे झाले आहे अशी टिप्पणी आमदार महेश शिंदे यांनी केली.

गेल्या 25 वर्षे सत्ता आणि जलसंपदा विभागाचे मंत्री असून सुद्धा ते या भागाचे पाणी प्रश्न, शेतक-यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. आता खोटे आरोप करत आहेत. कोरेगाव तालुक्यातील रामोशी वाडी आणि आजूबाजूच्या गावांचा आणि खटाव तालुक्याचा पाणी प्रश्न मीच सोडविणार असल्याचा दावा देखील आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

Pune : केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारला, पुण्यात ३२ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा

SCROLL FOR NEXT