Alibag MLA Accident  Saamtv
महाराष्ट्र

Alibag News : शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीचं अपघात प्रकरण, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

MLA Mahendra Dalvi Car Accident : महेंद्र दळवी यांच्या गाडीने एका बाईकस्वाराला उडवल्याने बाईकस्वराचा मृत्यू झाला होता. मुरुडनजीकच्या टोलनाक्यावर अपघात झाला होता.

सूरज सावंत

Alibag News :

अलिबागचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना २ मार्च रोजी घडली आहे. रायगडमधील मुरुड तालुक्यातील उसडी येथे ही अपघाताची घटना घडली होती. याप्रकरणी महेंद्र दळवी याचा ड्रायव्हरविरोधात मुरुड पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महेंद्र दळवी यांच्या गाडीने एका बाईकस्वाराला उडवल्याने बाईकस्वराचा मृत्यू झाला होता. मुरुडनजीकच्या टोलनाक्यावर अपघात झाला होता.

अपघातात जासीम अब्दुल रहेमान पासवारे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता महेंद्र दळवी यांचा ड्रायव्हर धनेश सणकर याच्यावर गुन्हा दाखल झालाआहे. (Latest Marathi News)

या अपघातात आमदार महेंद्र दळवी यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. पण यात त्यांच्या कारचं मोठं नुकसाना झालं आहे. कारच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला होता.

लातूरमध्ये भीषण अपघात, ४ भाविकांचा मृत्यू

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कारने ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना लातूर-नांदेड महामार्गावरील महाळंग्रा शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. 

 मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मंडके, शुभम किशोर लंकाढाई हे चौघे तरुण स्विफ्ट डिझायर कारने तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी

Sindhudurg Beach : रुपेरी वाळू अन् निळेशार पाणी! सिंधुदुर्गातील 'या' सुंदर समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य पाहून वेडे व्हाल

Kanda Methi Bhaji Recipe: चहासोबत खाण्यासाठी झटपट बनवा टेस्टी कुरकुरीत कांदा-मेथी भजी; वाचा सोपी रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; होणारी बायको कोण? हिऱ्याच्या अंगठीने वेधलं लक्ष, पाहा PHOTO

Accident News : भीषण अपघात! चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची पोलिसांच्या वाहनाला धडक; २ पोलीस अधिकाऱ्यांसह ७ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT