mla kiran sarnaik, mla prashant bamb saam tv
महाराष्ट्र

आमदार प्रशांत बंब यांचे मानिसक संतुलन ढासळले; सरनाईकांची टीका

सभागृहाच्या पायऱ्यांवर शिक्षक आमदार तसेच पदवीधर आमदार यांनी सुद्धा बंब यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला असल्याचे आमदार सरनाईक यांनी नमूद केले.

संजय जाधव

Buldhana : आमदार प्रशांत बंब (prashant bamb) यांची मानसिकता ढासळली असल्याचे प्रतिपादन अमरावती शिक्षक (teacher) मतदारसंघाचे आमदार ॲड. किरण सरनाईक (adv kiran sarnaik) यांनी सिंदखेड राजा येथे केलं. आमदार सरनाईक हे येथे एका कार्यक्रमाला आले हाेते. त्यावेळी त्यांनी आमदार बंब यांच्यावर टीकेची झाेड उठवली.

भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक संघटना यांच्यातील संघर्ष टोकाला पोहचला आहे. मुख्यालयी न राहता घरभाडे उचलणारे शिक्षक शासनाची फसवणूक तर करतच आहेत, पण आमच्या पिढ्या देखील बरबाद करत आहेत असा गंभीर आरोप आमदार बंब यांनी केला होता. शिक्षकांच्या चुकीच्या गोष्टींवर पांघरून घालणारे शिक्षक व मराठवाडा मतदारसंघच रद्द करून टाका अशी खळबळजनक मागणी केली आहे. त्यांच्या या भूमिकेवर अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार ॲड.किरण सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले.

अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲड. किरण सरनाईक म्हणाले आमदार प्रशांत बंब यांचा विषय निवडणूक आयोगाशी संबधीत आहे. त्यासाठी तो विषय त्यांनी त्यांच ठिकाणी लावुन धरावा. शिक्षक, पटवारी , ग्रामसेवक यांच्याबद्दल अपशब्द काढले. त्यामुळे अनेक संघटना त्यांचा प्रतिकार करून विरोध करत आहे. त्यांच्या विरोधामध्ये मोर्चे काढत आहे. विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. आमदार विक्रम काळे यांच्या प्रश्नाला सर्व शिक्षक आमदारांनी उभे समर्थन दिले होते.

आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक व ग्रामसेवक यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्याचा निषेध सभागृहामध्ये करण्यात आला होता. सभागृहातून त्यावेळी सर्व शिक्षक आमदार सभागृहाच्या बाहेर निघून गेले होते. त्याचबरोबर सभागृहाच्या पायऱ्यांवर शिक्षक आमदार तसेच पदवीधर आमदार यांनी सुद्धा त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

SCROLL FOR NEXT