सत्ता टिकविण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का? - गोपीचंद पडळकर  Saam TV
महाराष्ट्र

सत्ता टिकविण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का? - गोपीचंद पडळकर

जनाब संजय राऊत महाराष्ट्रात औरंगाजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहली जाते आणि त्यावरून उस्मानाबादेत दंगे होतात.

विजय पाटील

सांगली: जनाब संजय राऊत महाराष्ट्रात औरंगाजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहली जाते आणि त्यावरून उस्मानाबादेत दंगे होतात. आणि तुमच्या महाराष्ट्रातील कमकुवतपणा व लाचारी लपविण्यासीठी तुम्ही भाजपाला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहता. जनाब राऊत तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरून उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नाही का अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली, ते सांगलीच्या झरे मध्ये बोलत होते.

ऐन हिंदु सणाच्या दिवशी महाराष्ट्राची व हिंदुत्वाची शान असलेला भगवा ध्वज लावण्यावरून ज़र उस्मानाबादमध्ये पोलीसांवर दगडफेक होते. त्यावेळेसे ऐरव्ही उस्मानाबादला धाराशिव करू म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय. तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री स्वांतत्र्यवीर सावरकरांवर उलट सुलट लिहतात. यावेळेस सत्ता टिकविण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का?

तुमच्या औरंगाबादमध्ये गरोदर महिलांवर अत्याचार होतो तरी त्यावर आपल्याला एक ओळ खरडावी वाटत नाही. औरंगाबादला संभाजी नगर करू म्हणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय, असंच दिसतंय अशी टीका पडळकरांनी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT