MLA Disqualification Result Saam TV
महाराष्ट्र

MLA Disqualification Result: गप्प बसा नाही तर, निकालानंतर रट्टे ...; शिंदे गटाच्या आमदाराचं धक्कादायक विधान

Political News: निकालाबाबत कोणी काहीही म्हणत असेल तर पोलीस त्यांना रट्टे देऊन मोकळं करतील. त्यामुळे गुपचूप बसा नाही तर मग पाठीला तेल लावून बसा, असं खळबळ जनक विधान आमदार संतोष बांगर यांनी केलं.

Ruchika Jadhav

Santosh Bangar:

आज राज्यातील राजकारणातला ऐतिहासिक निर्णय लागणार आहे. शिवसेना पक्षातील कुठला गट अपात्र होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लगालं आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून निकाल आपल्या बाजूने लागणार असा दावा करण्यात येत आहे. अशातच शिंगे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे.

महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे निकालानंतर याबाबत कोणी काहीही म्हणत असेल तर पोलीस त्यांना रट्टे देऊन मोकळं करतील. त्यामुळे गुपचूप बसा नाही तर मग पाठीला तेल लावून बसा, असं खळबळजनक विधान आमदार संतोष बांगर यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. तसेच निकाल आमच्याच बाजूने लागणार असा दावाही त्यांनी केलाय.

आमदार अपात्रतेबाबत निकालाचे वाचन सुरू होण्यास आता काही तास शिल्लक आहे. निकाल आपल्याच बाजूने लागणार असा दावा शिंदे गटातील आमदार करत आहेत. ठाकरे गटाविरोधात निकाल लागल्यास त्यांच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे संतोष बांगर यांनी थेट पोलीस त्यांना रट्टे देऊन मोकळं करतील, असं धक्कादायक विधान केलं आहे.

सुनावणीनंतर निकालावरून शिंदे आणि ठाकरे गटातून प्रतिक्रिया उमटतील. यावेळी कुठलीही अनुचित घटना घडूनये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये म्हणून मुंबईतील विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान मुंबईतील मंत्रालय परिसरात मुंबई पोलीस वाहतूक पोलीस राखीव दल अशी विविध पथक परिसरात तैनात करण्यात आली आहेत.

देव पाण्यात ठेवले तरी निर्णय आमच्याच बाजूने लागणार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी निकाल आमच्याच बाजूने लागणार आणि जल्लोष आम्हीच करणार असा विश्वास व्यक्त केलाय. विरोधकांकडून कितीही प्रचार करण्यात आला तरी त्यांचा असुरी आनंद आहे. त्यांनी कितीही देव पाण्यात ठेवले तरी निर्णय आमच्याच बाजूने लागणार आणि जल्लोष देखील आम्हीच करणार असा टोला भोईर यांनी विरोधकांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अहिल्यानगर कार्यालयाचे स्थलांतर होणारच- विखे पाटील

'देऊळ बंद 2' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! अभिनेत्री स्नेहल तरडेने शेअर केले सेटवरचे 'Unseen' फोटो

Famous Actor Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि स्टँड-अप कॉमेडियन यांचे निधन; मनोरंजन विश्वात हळहळ

पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट, सरचार्ज रद्द होणार? बड्या नेत्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

Accident News : भीषण दुर्घटना! धावत्या कारने घेतला पेट; माजी सरपंचासह कुटुंबातील ४ सदस्यांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT