mukhyamantri mazi ladki bahin yojana Saam TV
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : आमदार महोदयांची चमकोगिरी, लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर छापला स्वत:चा फोटो; पाहा VIDEO

Mla Devendra Bhuyar News : माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर एका आमदार महोदयांनी चक्क आपला फोटो छापला आहे. विशेष बाब म्हणजे या अर्जाचे मतदारसंघात वाटपही करण्यात आले आहे.

Satish Daud

अमर घटारे, साम टीव्ही अमरावती

राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला ठिकाठिकाणी गर्दी करीत आहेत. अशातच अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर एका आमदार महोदयांनी चक्क आपला फोटो छापला आहे. विशेष बाब म्हणजे या अर्जाचे मतदारसंघात वाटपही करण्यात आले आहे.

हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या आमदार महोदयांवर तातडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करत कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. देवेंद्र भुयार असं या आमदार महोदयांचं नाव असून ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार आहेत.

सध्या भुयार यांनी महायुती सरकारला आपलं समर्थन दिलंय. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघातील आमदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे सुरू असताना देवेंद्र भुयार यांनी आपले फोटो असलेले अर्ज अंगणवाडी सेविकांना दिले.

तसेच मतदारसंघात या अर्जांचे वाटप करा, असे त्यांनी अंगणवाडी सेविकांना सांगितले. हा संपूर्ण प्रकार काँग्रेसचे विक्रम ठाकरे यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने यावर आक्षेप घेत तहसीलदाराकडे तक्रार अर्ज दाखल करत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर तहसीलदारांनी देवेंद्र भुयार यांचे फोटो असलेले अर्ज तत्काळ रद्द करण्याचे ठरवले आहेत.

या प्रकारामुळे अनेक महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रद्द करण्यात आलेले अर्ज पुन्हा भरण्यात येणार आहे. महिलांनी अर्ज भरताना त्यावर कुणाचे फोटो तर नाहीत ना? हे तपासून घ्यावे शासनाने दिलेले अर्ज वैध धरले जाईल, असं आवाहन तहसीलदारांनी केलं आहे. दरम्यान, चमकोगिरी करण्यासाठी आमदार भुयार लोकांना मूर्ख बनवत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विक्रम ठाकरे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT