mla bharat gogoavale at raigad fort saam tv
महाराष्ट्र

Raigad: सेना आमदार आक्रमक; रायगडावरील निकृष्ट बांधकामाच्या चाैकशीसाठी विधानसभेत आवाज उठविणार

शासनाने चांगले काम व्हावे यासाठी निधी उपलब्ध केला आहे. यासाठी जास्तीचे पैसे मोजले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- राजेश भोस्तेकर

रायगड : किल्ले रायगडाला (raigad fort) गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी प्राधिकरणतर्फे जतन आणि संवर्धन काम सुरू आहे. यासाठी राज्य शासनाने ६०६० कोटी निधीही मंजूर केला आहे. शंभर कोटी निधी वितरित झाला आहे. परंतु येथे सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. यावरुन महाड (mahad) पोलादपूरचे शिवसेनेचे (shivsena) आमदार भरत गोगावले (bharat gogavale) यांनी किल्ले रायगडावरील कामाची पाहणी केली. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले असून यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्यास विधानसभेत प्रश्न उपस्थित करून चौकशी लावण्याचा इशारा आमदार गाेगावले यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. (raigad fort latest news)

स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगडावर (raigad) प्राधिकरण मार्फ़त कामे सुरू आहेत. किल्याच्या पायरी बांधकाम हे निकृष्ट करण्यात आले असून दगड निघत आहेत. मातीच्या ढिकळाप्रमाणे फुटणारे बांधकाम मटेरिअल वापरण्यात आले असल्याचे ग्रामस्थांनी आमदार गोगावले (mla bharat gogovale latest marathi news) यांना दाखविले. शासनाने चांगले काम व्हावे यासाठी निधी उपलब्ध केला आहे. यासाठी जास्तीचे पैसे मोजले आहेत.

हे काम निकृष्ट होत असेल तर याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करून चौकशी केली जाईल. रायगड किल्ल्याबाबत (raigad fort) असे भ्रष्टाचाराचे मुद्दे चर्चेत आले तर गय केली जाणार नाही असा इशारा आमदार भरतशेठ गोगावले यांनी स्थानिकांनी बांधकामाबाबतची वस्तुस्थिती दाखवुन दिल्यानंतर अधिकाऱ्यांना दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT