NCP MLA Amol Mitkari Akola Speech Saam TV
महाराष्ट्र

Akola: ५० खोक्यांसाठी राष्ट्रवादीचे आमदार गुवाहाटी, सुरतला गेले नाही याचा अभिमान: अमोल मिटकरी

NCP MLA Amol Mitkari Akola Speech: कॅबिनेटमध्ये समावेश व्हावा यासाठी रवी राणांनी रक्ततुला घेतल्याचं मिटकरी म्हणाले.

अॅड. जयेश गावंडे

अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागलं. आमदारांमध्ये मंत्रीपदासाठी चढाओढ असल्याचं मिटकरी म्हणाले. कॅबिनेट मंत्रीपदासाठी रवी राणांकडून फडणवीसांची रक्ततुला करण्यात आली, त्यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश व्हावा यासाठी रवी राणांनी रक्ततुला घेतल्याचं मिटकरी म्हणाले. अकोल्यातील (Akola) मूर्तिजापुर येथे आयोजित दहिहांडीच्या कार्यक्रमात मिटकरी बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंके यांलस राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (Akola Political News)

हे देखील पाहा -

यावेळी आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, आम्ही गोर-गरीबांपर्यत पोहोचू, त्यांनी पन्नास-पन्नास खोक्यांची मलाई ४० आमदारांपर्यत पोहोचवली. आता तुमच्याही आमदारांना वाटते मंत्रिपद मिळते का? एवढी लॉबिंग लागलेली आहे तिकडं. आता शिंदे गट आणि भाजपमध्ये मारामाऱ्या सुरु आहेत. अमरावतीत रवी राणांनी रक्त तुला घेतली, त्यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश व्हावा, असाच काहीसा उद्देश यामागील आहे. अनेक आमदारांनाही वाटतेय असे अमोल मिटकरीही म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT