Chandrakant Patil news  Saam Tv
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील यांनी भीक मागून मंत्रिपद मिळवलं; 'त्या' वक्तव्यावर आमदार-खासदार भडकले, म्हणाले...

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर राज्यात आता नवा वाद उफाळला आहे.

भारत नागणे

रश्मी पुराणिक

Amol Mitkari News : भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांवरील केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर राज्यात आता नवा वाद उफाळला आहे. 'भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपद मिळावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भीक मागितली होती, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. (Latest Marathi News)

मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी 'कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यावर केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादाचे आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतला आहे.

'भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपद मिळावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भीक मागितली होती. तशी महामानवांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली नाही. लोकांकडून वर्गणी गोळा करून त्यांनी शाळा सुरू केल्या', अशी सडकून टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज पंढरपुरात केली.

'भाजप नेत्यांच्या मस्तकातील घाण काढण्यासाठी गाडगे बाबांचा झाडू हाती घ्यावा लागेल, असा इशारा देखील अमोल मिटकरी यांनी दिला. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा खासदार अमोल कोल्हे यांनी देखील निषेध केला आहे.

'छत्रपती शिवाजी महाराज व आपल्या सर्वच महापुरुषांचा अवमान कुणीही करु नये म्हणूनच काल मी संसदेत महापुरुषांविषयी बोलताना कायद्याची तरतूद करावी, अशी मागणी करत होतो. जेणेकरून आपल्या अस्मितेला नख लावण्याचं धारिष्ट कोणी करणार नाही, असं ट्विट करत खासदार अमोल कोल्हे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील औरंगाबादेतील एका कार्यक्रमात म्हणाले, 'अनुदानासाठी सरकारवर अवलंबून का राहता? या देशामध्ये शाळा कुणी सुरु केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सगळ्यांनी शाळा सुरु केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली'.

'शाळा सुरु करायच्या आहेत आम्हाला पैसे द्या. त्याकाळी दहा-दहा रुपये द्यायचे. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत. त्यामुळे त्यांची मदत घेऊन 'सीएसआर'च्या माध्यमातून पुढं गेलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील असेही पुढे म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest Blouse Hand Designs: या 5 पॅटर्नमध्ये ब्लाऊजच्या हाताची डिझाईन शिवा, कोणतीही साडी नेसली तरी सुंदरच दिसेल

KDMC News : राज ठाकरेंना आणखी एक धक्का, शहराध्यक्षांचा मनसेला जय महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: परभणीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील दोन्ही गट स्वबळावर लढण्यासाठी ठाम

Hair Care: हजारो रुपयांच्या केराटिन ट्रीटमेंट्स कशाला? या ७ घरगुती कंडिशनरने केस बनवतील सिल्की आणि सॉफ्ट

Manikrao Kokate : कोकाटेंचे मंत्रिपद, आमदारकी जाणार? अंजली दमानियांनी सांगितले कारण

SCROLL FOR NEXT