Aditya Thackeray and abdul sattar  saam tv
महाराष्ट्र

'आदित्य ठाकरे यांनी आधी राजीनामा द्यावा,मग...'; अब्दुल सत्तारांचे थेट आव्हान

आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांना राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरे जाण्याचे आव्हान करण्यात येत आहे. त्यावर आता आमदार अब्दुल्ल सत्तार (Abdul Sattar) यांनी आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

साम टिव्ही ब्युरो

सिल्लोड : राज्यात शिंदे गट आणि शिवसेनेचा संघर्ष चांगलाच पेटला आहे. बंडाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. शिंदे गटाने बंडखोरी केल्यानं शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार टीका करत आहेत. तर आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांना राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरे जाण्याचे आव्हान करण्यात येत आहे. त्यावर आता आमदार अब्दुल्ल सत्तार (Abdul Sattar) यांनी आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ( Abdul Sattar News In Marathi )

आज, रविवारी सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा झाला. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर उपस्थित होते. या सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना सत्तार म्हणाले, 'आदित्य ठाकरे तुम्ही सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकून आला आहात. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आधी राजीनामा द्यावा. मग मी राजीनामा देतो'.

'मी मुस्लिम असूनही हिंदुत्वासोबत गेलो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबतही सगळेच होते. गेल्या २ वर्षात त्या मुख्यमंत्री यांच्याकडे अनेक फाईल रखडल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी १० दिवसांत त्या फाईल मार्गी लावल्या. रामदास कदम यांनी मंत्री असताना मी काँग्रेसचा आमदार होतो. तरी त्यांनी कधीही भेदभाव केला नाही', असेही सत्तार म्हणाले.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी यावेळी रावसाहेब दानवे यांच्यावरही मिश्किल टीका केली. 'रावसाहेब दानवे यांच्याकडून आपल्याला रेल्वे घ्यायची आहे. त्यांनी नाही दिली तर २ वर्षात निवडणूक आहेच. दानवे म्हणाले होते, सत्तार यांचा बिस्मिल्लाह करायचा आहे, पण झालाच नाही. त्यांनी माझ्या विरोधात जे दिले त्यांचाच झाला, अशी मिश्किल टीका सत्तार यांनी दानवे यांच्यावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माणिकराव कोकाटे विजयाच्या उंबरठ्यावर

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT