Mumbai: संजय राऊतांच्या घरातून साडेअकरा लाख रुपयांची रक्कम जप्त; ईडी चौकशी अजूनही सुरुच

Sanjay Raut Latest News: नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार संजय राऊत याच्या घरातून ईडीने ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
sanjay Raut ed news
sanjay Raut ed newssaam tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. सध्या त्यांना मुंबईच्या ईडी (ED) कार्यालयात नेण्यात आलं आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार संजय राऊत याच्या घरातून ईडीने ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. सोबतच प्रॉपर्टीची काही कादगपत्रंही ईडीने जप्त केली आहे. या साडेअकरा लाख रकमेबाबत संजय राऊत यांना ईडीकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या घरी जी साडेअकरा लाख रुपयांची रक्कम सापडली त्यापैकी १० लाख पक्षाचे आणि दीड लाख घरातील घरकामासाठी ठेवल्याचे सांगण्यात आल्याची माहिती असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Sanjay Raut Latest News)

हे देखील पाहा -

आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ईडीच्या पथकाने राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली. यानंतर संजय राऊत यांना ईडीने (ED) ताब्यात घेत ईडी कार्यालयाकडे नेण्यात आलं. आता त्यांच्या घरातून ईडीने ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. सोबतच प्रॉपर्टीची काही कादगपत्रंही ईडीने जप्त केली आहे. पत्राचाळ व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांवर करण्यात आला होता.

संजय राऊत (sanjay raut) ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करत नव्हते, अशीही माहिती समोर आली आहे. ईडीचं पथक राऊतांना ताब्यात घेवून मुंबईच्या ईडी कार्यालयात पोहचले असून राऊतांची चौकशी सुरू आहे. दरम्यान ईडी कारवाईत जाण्यापूर्वी राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुचक व्यक्त केलं आहे. "भविष्यामध्ये मी आत असेन किंवा बाहेर त्याची मला पर्वा नाही, याहीपेक्षा मी मोठे स्फोट करत राहीन तेव्हा भाजपला कळेन मी काय आहे" असं संजय राऊत म्हणाले आहेत.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, जी काही कारवाई व्हायची ती होऊ द्या, मी काही घाबरत नाही. राजकीय सूडोपोटी हा खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे, उद्धव ठाकरे माझ्या पाठीशा आहे, शिवसैनिकांचं बळ आहे. संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो, देश ओळखतो ते शिवसेनेमुळे. हा संजय राऊत कधी गुडघ्यावर चालत नाही आणि सरपटत जात नाही, निधड्या धातीनं उभं राहतो आणि लढतो कुणी काहीही म्हणू द्या. या कारवाईला मी निधड्या छातीनं समोर जातो आणि लढतो.

sanjay Raut ed news
'मी बाळासाहेबांचा शिवसैनिक...'; ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

या कारवाईलासुद्धा मी निधड्या छातीनं समोर जातोय, यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल. या ज्या राजकीय सुडाच्या कारवाय सुरू आहेत, फक्त भाजपविरोधी लोकांवर सुरू आहेत. आमच्यासारखेही काही लोकं आहेत, जे न झुकता न घाबरता कारवायांना सामोरं जातात आणि लढाई लढतात. अशा कारवायांच्या भितीनं अनेक लोकं पक्ष सोडून जातात, शरणागती पत्करतात संजय राऊत त्यातले नाही. मरेन पण झुकणार नाही, वाकणार नाही, शिवसेना सोडणार नाही असं संजय राऊत म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com