Weather Update  Saam tv
महाराष्ट्र

Weather Update : राज्यात ऊन पावसाचा खेळ; विदर्भात उष्णतेची लाट, तर कुठे बरसणार पाऊस?

Maharashtra Weather Update : राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. तर काही ठिकाणी कुठे पाऊस बरसताना पाहायला मिळत आहे.

Vishal Gangurde

राज्यात एकीकडे सूर्य आग ओकतोय. तर दुसरीकडे काही भागात अवकाळी पाऊस बरसत आहे. काही भागात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तर विदर्भात उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे.

विदर्भाच्या अकोला जिल्ह्यात तापमान ४४ डिग्रीअंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. तर अमरावतीत ४३ डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. विदर्भात पुढील दोन दिवस आणखी दोन अंशानी पारा वाढणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. दुसरीकडे हवामान विभागाने काही भागात पाऊस बरसणार असल्याचा इशारा दिला आहे. राज्यात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लातूर, धाराशिव , रत्नागिरी आणि सोलापुरात पुढील ३-४ तासांत वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील ३-४ तासांत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उष्णतेच्या लाटेचा राज्यावर परिणाम होणार

यंदा 'अल निनो'चा परिणाम जाणवणार नाही. दुसरीकडे सरासरी इतके पर्जन्यमान असेल. मात्र कमाल तापमानात 5 अंश सेल्सिअस इतकी वाढ होईल. या उष्णतेच्या लाटेचा महाराष्ट्रातही मोठा परिणाम होणार आहे. येत्या 2 महिन्यांमध्ये प्रचंड उकाडा जाणवेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता वाढतेय

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसात उन्हाची तीव्रता सातत्याने वाढतेय. त्यात नाशिक जिल्ह्यात दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आलाय. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या असून आपत्कालीन परिस्थितीसाठी नाशिक महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आलेत.

विदर्भात सूर्य आग ओकतोय

विदर्भात सध्या सूर्य आग ओकतोय....सोमवारी अकोल्यात ४४ तर अमरावतीत ४३ अंश सेल्सिअस तापमान होतं...पुढील दोन दिवस तापमानात आणखिन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये...उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT