MIRAJ GOVERNMENT HOSPITAL SLAB COLLAPSE saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 7 जण ढिगाऱ्याखाली अडकले

Miraj Government Hospital Entrance Gate Slab Collapse Accident: मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेली नवीन कमान कोसळली. स्लॅब कोसळून अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती असून बचावकार्य सुरू आहे.

Omkar Sonawane

विजय पाटील, साम टीव्ही

सांगली: मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेली नवीन कमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. कमानीचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत सात ते आठ कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

स्लॅब कोसळल्यानंतर अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी पाच ते सहा कामगारांना बाहेर काढण्यात यश आले असून, इतरांचा शोध आणि बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी जेसीबीच्या सहाय्याने स्लॅबचा ढिगारा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णालय प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

दरम्यान, शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नवीन कमान उभारण्याचे काम सुरू होते. कमानीच्या बांधकामासाठी स्लॅब टाकला जात असतानाच तो अचानक कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांचा आणि जखमींचा नेमका आकडा प्रशासनाकडून अधिकृतपणे स्पष्ट होणे बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: ऑक्टोबर हिटमुळे चेहरा ड्राय आणि काळा पडलाय? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' सोपा उपाय

Monday Horoscope: या ४ राशींच्या लोकांनी आज पैशांच्या बाबतीत राहावे सावध; खर्च करताना घ्या विचारपूर्वक निर्णय

Navratri Look : गरबा-दांडियासाठी ट्रेंडी आउटफिट्स आयडियाज, पहा बेस्ट पर्याय

Rahul Gandhi : हातात संविधान घेत राहुल गांधींची मोठी घोषणा, उद्या सर्वांना दिल्लीला बोलवलं, कारणही सांगितले

ठाकरे कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये; ठाकरे गटातील कार्यकर्ते आक्रमक, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT