सुशील थोरात
Ahmednagar News : मिरारोड येथील गीता नगरच्या सातव्या मजल्यावर लिव्हइनमध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय तरुणीची निर्दयीपणे हत्या करून तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर बुधवारी आली. मनोज साने असं या आरोपीचं नाव आहे, तर सरस्वती वैद्य असं मृत महिलेचं नाव आहे.
मिरारोड येथील या क्रूर हत्याकांड प्रकरणाचं अहमदनगर कनेक्शन समोर आली आहे. सरस्वती वैद्य ही अनाथ होती अहमदनगरमध्ये तिने दहावीपर्यंत शिक्षण घेतले होते. अहमदनगरमधील जानकी आपटे अनाथआश्रम या संस्थेत याआधी राहत होती. ती नोकरी शोधण्यासाठी मुंबईला गेली आणि तिला तिचा मामा भेटला अशी माहिती तिने संस्थेला दिली होती. मुंबईला जाण्यासाठी तिला दाखल्याची गरज होती, मात्र दाखला देत नसल्याने तिने या संस्थेवर पाच वेळा केसही दाखल केली होती.
माझा मामा मुंबई येथे आहे आणि त्यांनी मला ओळखले असून मला त्याच्याकडे जायचे असे सांगून ती मुंबईला निघून गेली होती. माझ्या मामाकडे कपड्याच्या मोठमोठ्या मिल असून मी इकडे खूश असल्यास तिने अहमदनगरमध्ये संस्थेत आल्यावर सांगितले होते. मात्र दोन वर्षांपूर्वी ती पुन्हा संस्थेत आली होती तेव्हा तिची तब्येत अत्यंत खराब झाली होती. (Latest Marathi News)
सहकाऱ्यांना लक्षात आल्यानंतर तिला संस्थेतील संस्थाचालकांनी, कर्मचाऱ्यांनी विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने काहीही माहिती दिली नव्हती. अचानक तिच्या भयानक मृत्यूची घटना संस्थेला कळाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सरस्वतीच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जानकीबाई आपटे अनाथ बालिकाश्रम संस्थेच्या कर्मचाऱ्यांना आता केली आहे. (Breaking News)
महिला आयोगकडून दखल
मिरारोड येथील हत्याकांची दखल आता महिला आयोगाने देखील घेतली आहे. या प्रकरणात महिला आयोगाच्या सदस्य अॅड. गौरी छाबरीया आणि उत्कर्षां रूपवते यांनी नया नगर पोलीस ठाण्यात भेट दिली. यावेळी त्यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाला पाहिजे अशी मागणी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.