Vasai Virar News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : एका गुन्ह्यानं २२ गुन्हे उलगडले; ३ हजार CCTV तपासले, चोरलेले ५३ ट्रक जप्त, सर्वात मोठी चोरी उघड

एका टेम्‍पोच्‍या तपासातून २२ गुन्‍हे उघकीस; ३ हजाराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी

चेतन इंगळे

मीरा रोड : मीरा भाईंदर वसई– विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका टेम्पोच्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. परंतु, यातून देशभरातील एका मोठ्या अवजड वाहनाच्या चोरीची उकल केली आहे. यात पोलिसांनी (Mira Road) मीरारोड ते राजस्थान दरम्यान ३ हजाराहुन अधिक सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे तपासत ४८ ट्रक, ३ टेम्पो, २ कार असा 4४ कोटी ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करत २ आरोपी ताब्यात घेतले आहेत. राजस्थान, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्रात या राज्यातून २२ गुन्हे पोलिसांनी उघकीस आणले आहेत. तब्बल दोन महिने या गुन्हाचा तपास चालला होता. (Maharashtra News)

मीरारोड येथे राहणारे विनय कुमार पाल यांचा डिसेंबर महिन्यात एक टेम्पो रस्त्यावरून चोरी गेला होता. या संदर्भात त्यांनी काशिमीरा पोलिसांत तक्रार दिली होती. या गुन्ह्यावरून पोलिसांनी अंदाज ही बांधला नसेल की त्यांच्या हाती असे काही लागेल. पण पाल यांच्या टेम्पोच्या तपासात पोलिसांच्या हाती (Vasai Virar) एक आरोपी लागला. त्याच्याकडून पोलिसांना या मागे मोठी टोळी असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी १४ पोलीसांचे पथक तयार केले. हे पथक राजस्थान, गुजरात, हरियाणा राज्यात तपासाला रवाना केले.

फास्‍टटॅगवरून पुढचे धागेदोरे

तपासात चोरी गेलेल्या एका ट्रकवरील टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी वापरण्यात आलेल्या फास्टटॅगची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचे तांत्रिक विश्लेषण करत राजस्थानमधील मेवात गावातून फारुख खान आणि मुबीन हारीस याला अटक केली. त्यांनी देशभरातून ५३ ट्रक चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, हे आरोपी गाडीचे बनावट कागदपत्रे तयार करून गाड्या स्क्रॅब करण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्यांची वाहतूक करून वेगवेगळ्या राज्यात विकत असल्‍याचे मीराभाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले. यात इतर आरोपी असून पोलीस त्यांचा तपास करत आहेत असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा वाद मिटला, राज ठाकरेंच्या घरी येऊन जैन समाजाने मागितली माफी

Famous Singer Death: संगीत विश्वातील प्रसिद्ध आवाज हरपला; ज्येष्ठ गायकाचे अल्पशा आजाराने निधन

ITR Filling 2026 : करदात्यांनो लक्ष द्या! ITR फाइल केला? मग 30 जूनपर्यंत ई-मेल नक्की तपासा; कारण जाणून घ्या

प्रेमीयुगुलासाठी बेस्ट! मुंबईतील 'या' समुद्रठिकाणी गेल्यानंतर रोमॅन्टिक फिल येईल

Heart health: 90 दिवसात तुमचं हृदय बनेल मजबूत; डॉक्टरांनी सांगितल्या ५ सोप्या टीप्स

SCROLL FOR NEXT