Manasvi Choudhary
पावसाळा म्हटलं की मस्त हिरवं गार वातावरण सर्वत्र झालेलं असतं. या वातावरणात पार्टनरसोबत फिरायला जाण्यासाठी मुंबई हे ठिकाण बेस्ट आहे.
पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांचे दृश्य मनाला भुरळ घालते. रिमझिम पावसात तुम्ही देखील फिरण्याचा प्लान करत असाल तर खालील 5 ठिकाणांना नक्की भेट द्या.
मुंबईतील दादर चौपाटी हे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथून दिसणाऱ्या समुद्राच्या उंच लाटा पावसाळ्यात मनमोहून टाकते. जोडीदारासोबत खास तुम्ही या ठिकाणी निवांत वेळ घालवू शकता.
वरळी सी फेस हे मुंबईतील सर्वात मनाला शांत वाटणारे आणि रोमँटिक ठिकाणांपैकी एक मानले जाते. पावसाळ्याच्या दिवसांत जेव्हा समुद्राच्या लाटा इथल्या कठड्यांवर येऊन आदळतात, तेव्हा मज्जा काही वेगळीच असते.
बांद्रा बँडस्टँड हे प्रेमीयुगुलासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. एका बाजूला अथांग समुद्र, खडकाळ किनारा आणि दुसरी बाजूला बॉलिवूड सेलिब्रिटींचे बंगले! पावसाळ्यात इथल्या कट्ट्यांवर बसून रोमान्सचा अनुभव घेऊ शकता.
जर तुम्हाला मुंबईच्या गजबजाटापासून शांत ठिकाणी जायचं असेल तर भाईंदर जवळील उत्तन बीचला भेट द्या, निसर्गाच्या सानिध्यात येथे गेल्यानंतर मनाला प्रसन्न वाटेल.
बांद्र्यातील कार्टर रोड हा फेमस आहे. पावसाळ्यात जोडीदारासोबत संध्याकाळच्या वेळी येथे वॉकिंगसाठी जाऊ शकता.