Manasvi Choudhary
महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांमध्ये 'ठुशी' ला विशेष महत्व आहे. गळ्यापाशी घट्ट बसणारा हा दागिना सौंदर्यामध्ये उठून दिसतो.
'ठुशी' हा अस्सल मराठमोळा दागिना आहे. तुम्हालाही यंदा वटपौर्णिमेला मराठमोळा लूक करायचा असेल तर आजच ठुशी दागिना खरेदी करा.
काठपदर साडी असो किंवा पैठणी गळ्यात 'ठुशी' हा दागिना अधिक शोभून दिसतो. 'ठुशी' या दागिन्यामध्ये अनेक नवनवीन डिझाईन्स आहेत त्या तुम्ही नक्की ट्राय करा.
जर तुम्ही संपूर्ण लूक पारंपारिक केला असेल तर काळ्या मण्यांमध्ये डिझाईन असलेली ठुशी घाला. सोन्याच्या लहान मण्यांसोबत काळ्या मण्यांचे कोंदण असलेली ही ठुशी साडीवर अधिक उठून दिसते.
काळ्या आणि सोनेरी मण्यांमध्ये तयार केलेली हि ठुशी खूप छान दिसते. कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही साडीवर ही ठुशी घालू शकता.
सध्या बाजारात मॅचिंग कानातल्यांसह ठुशीचे कॉम्बो सेट आहेत. यामध्ये ठुशीच्या डिझाईनसारखेच लहान कानातले मिळतात. साडीवर हा संपूर्ण सेट घातल्यास अधिक उठून दिसेल.
जर तुम्हाला सोन्याऐवजी काहीतरी हटके ट्राय करायचे असेल, तर ऑक्सिडाईज किंवा चांदीमध्ये देखील ठुशी नेकलेस सध्या उपलब्ध आहेत ते तुम्ही निवडू शकता.