Manasvi Choudhary
आजकाल बद्धकोष्ठता ही समस्या सामान्य झाली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पुरेसे पाणी न पिणे, आहारातील फायबरची कमतरता हे बद्धकोष्ठता होण्याची मुख्य कारणे आहेत.
पोटात जडपणा जाणवणे, गॅस, घाणेरडे ढेकर देणे ही बद्धकोष्ठता झाल्याची मुख्य लक्षणे शरीरात दिसतात.
या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी 4 सोपे योगासने करू शकता ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
पवनमुक्तासान हे योगासन पोटातील गॅस आणि पोटफुगी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. हे योगासन केल्याने पोटावर दाब पडतो, ज्यामुळे आतड्यांची हालचाल व्यवस्थित होते.
भुजंगासन या योगासनामध्ये पोटाचा आणि कंबरेचा भाग ताणला जातो यामुळे शरीराची पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे पोटातील अंतर्गत अवयवांचे रक्ताभिसरण सुधारते आणि मंदावलेली पचनक्रिया पुन्हा सुरळीत होते.
मलासन या योगासनामध्ये पोट आणि ओटीपोटाचा व्यायाम होतो हा योगा नियमितपणे केल्याने शरीराची मल विसर्जनाची नैसर्गिक प्रक्रिया सुधारते.
जेवणानंतर वज्रासन केल्याने पचनक्रिया सुधारते. रोज रात्री किंवा दुपारी जेवल्यानंतर ५ ते १० मिनिटे वज्रासनात बसल्याने रक्ताचा प्रवाह सुधारते. अन्न लवकर पचते
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.