Manasvi Choudhary
यंदा वटपौर्णिमेला अस्सल मराठमोळा लूक करायचा असेल तर पैठणी साड्यांची योग्य निवड करा. लूक उठून दिसेल.
मुनिया पैठणी हा साडीचा प्रकार सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. या पैठणीच्या काठावर किंवा पदरावर मुनिया म्हणजेच पोपटाचे नक्षीकाम केलेले असते.
शिवशाही पैठणीच्या पदरावर भरगच्छ डिझाईन असते, ज्यामुळे ही साडी नेसल्यानंतर अतिशय राजेशाही लूक मिळतो.
जर तुम्हाला पारंपरिक लूक हवा असेल इरकल साडी निवडा. या साडीमध्ये मोर, पोपट आणि कमळाचे सुंदर नक्षीकाम केलेले असते.
सणावाराला तुम्ही चंद्रकोर पैठणी नेसू शकतात. या पैठणीवर 'नथ' आणि 'चंद्रकोर' अशी खास डिझाईन असते.
तुम्हाला अगदी साधी पण तितकीच आकर्षक साडी हवी असेल तर नारायण पेठ साडी निवडा. या साडीवर लहान-मोठ्या चौकड्यांचे नक्षीकाम केलेले असते