Civic outrage in Mira-Bhayandar over gold-priced garbage bins; ₹9 lakh per bin sparks scam allegations Saam Tv
महाराष्ट्र

सोन्याच्या भावात कचऱ्याचा डबा,कोट्यवधींचं कंत्राट, आयुक्त अनभिज्ञ कचऱ्याच्या डबे खरेदीत घोटाळा

Shocking Civic Spend: चक्कं कचऱ्याचा डबा सोन्याइतका महाग..... हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल... मात्र हे खरं आहे... इतका महाग डबा कुणी खरेदी केलाय? कुठे हा सगळा प्रकार घडलाय?

Suprim Maskar

कचऱ्याच्या डब्याची किंमत किती असते.. फार फार तर 300,500 रुपये.. मात्र हाच कचऱ्याचा डबा जर सोन्याच्या दरात विकत घेतला जात असेल तर.. मिरा भाईंदर महापालिकेने हा चमत्कार करून दाखवला आहे. पालिकेने एका कचऱ्याचा डब्याचा भाव तब्बल 9 लाख रुपये इतका लावला आहे... मिरा भाईंदर महापालिकेने कचऱ्याच्या डब्यांची खरेदी काय किंमती ठेवल्यात

सोन्यापेक्षा महाग कचऱ्याचा डबा !

21 ऑटोमॅटिक डबे - 9 लाख 34 हजार 660 रूपयाला

500 स्टेनलेस स्टील 2 बिन डबे 66,183 रुपया

500 स्टेनलेस स्टील 3 बिन डब्बे 69,668 रुपयाला

2868 फायबर डबे 34 हजार 518 रुपयाला

डबे खरेदीसाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केल्यानंतर ‘कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ या कंपनीला हे कंत्राट देण्यात आलयं. याचं कंपनीकडून बाजारभावापेक्षा 7 ते 8 पट अधिक दराने हे डबे खरेदी केल्याची टीका महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर केलीय जातेय

मिरा भाईंदर महापालिकेच्या याप्रकरणामुळे नागरिकांनीही संताप व्यक्त केलाय.

त्यामुळे चौकशीनंतर वर्कऑर्डर देणार असल्याची माहिती जरी आयुक्तांनी दिली असली तरी निविदा प्रक्रिया राबवून पुढील सर्व प्रक्रिया करताना यासंदर्भात आयुक्तांनी कुठलीच माहिती का घेतली नाही? सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून कचरा संकलनासाठी पैसे आकारणाऱ्या पालिकेनं लुटीचा बाजार मांडलाय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. मात्र अधिकाऱ्यांच्या संगनमतानं करण्यात आलेला हा प्रताप महापालिकेतल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारा ठरणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपुरात युनियन बँकेविरोधात मनसेचा संताप, मराठीतील FIR नाकारल्याने आंदोलन | VIDEO

Kalyan : कल्याणकरांची वाहतूक कोंडीची कटकट संपणार, यु टाईप अन् मलंगगडचे रस्ते चकाचक होणार

Navi Mumbai News : सावधान! सडलेल्या केळीचे वेफर्स, नवी मुंबईतील किळसवाणा प्रकार समोर

Homemade paratha masala recipe: घाईघाईत पराठा बनवताय? अजून टेस्टी बनवण्यासाठी घरच्या घरी बनवा सिक्रेट पराठा मसाला

Pandharpur Crime : पंढरपुर हादरले! माय लेकाची घरात घुसून हत्या; मारेकरी घराला कुलूप लावून पसार

SCROLL FOR NEXT