Tanaji Sawant secret explosion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर 9 महिन्यांपूर्वी महाविकासआघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला समोरे न जाता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
शिवसेनेतील ही अचानक झालेली बंडखोरी नेमकी कशी झाली? याबाबात अजूनही जनतेच्या मनात कुतूहल आहे. याबाबत राज्य सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
महाविकासआघाडी सरकार पाडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शंभर ते दीडशे बैठका घेतल्या होत्या. या बैठकांनंतर अखेर शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असा असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे सोमवारी तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीच्या प्रांगणात कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना तानाजी सावंत यांनी मागच्या सरकारमधील अनेक खुलासे केले आहे.
'उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगितले'
ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा याच्या नेतृत्वाखाली मागील विधानसभेची निवडणूक लढवली गेली. जनतेने भाजप-शिवसेनेला कौल दिला होता, परंतु उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली.
त्यावेळी चांगले काम करूनही आपल्याला मंत्रिपदाची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे पुन्हा ‘मातोश्री’ बंगल्यावर पाय ठेवणार नाही असे मी त्याच वेळी उद्धव ठाकरे यांना ठणकावून सांगितले होते, असा खुलासा देखील सावंत यांनी केला.
'पहिले बंड धाराशिव जिल्हा परिषदेत'
ते म्हणाले, यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधात पहिले बंड धाराशिव जिल्हा परिषदेत घडवून आणले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. याला आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ होती, असाही खुलासा त्यांनी केला आहे. (Latest Political News)
'जे बोलतो ते करतोच'
तानाजी सावत यांनी सांगितले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आपणच पुढाकार घेतला. मी जे बोलतो ते करतोच असे सांगताना त्यांनी आगामी काळात विकासाच्या बाबतीत धाराशिव जिल्हा पश्चिम महाराष्ट्राच्या पुढे असेल अशी ग्वाही देखील यावेळी बोलताना दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.