Sanjay Shirsat news Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

sanjay shirsat political News : राज्यात असंवेदनशील नेत्यांची काही कमी नाहीय... अशातच मंत्री संजय शिरसाटांच्या एका कृतीमुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकलेत...शेतकरी उपोषणकर्त्यासोबत शिरसाटांनी नेमकं असं काय केलं? की विरोधकांनी त्यांच्याविरोधात रानं उठवलयं... पाहूयात...

Saam Tv

ही दृश्य आहे.. छत्रपती संभाजीनगरमधल्या संजय शिरसाटांच्या अलिशान घरातील... शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी कन्नडमध्ये संदीप सेठीं या शेतकऱ्यांचं उपोषण सुरु होतं. हे उपोषण सोडवण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न केले. अखेर आश्वासनानंतर उपोषणकर्त्यानं हे उपोषण मागे घेण्याचं ठरवल. मात्र पालकमंत्री शिरसाटांच्या बिझी शेड्युलमुळे मंत्री महोदयांना उपोषण स्थळी जाणं शक्य नसल्यानं त्यांनी थेट उपोषणकर्त्यांलाच आपल्या निवासस्थानी बोलवण्याच फर्मान सोडलं. मग काय उपोषणकर्ते शिरसाठांच्या घरी दाखल झाले आणि शिरसाटांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषणकर्त्यांनं आपलं उपोषण मागे घेतलं.. मात्र घडल्या घटनेनं मंत्री शिरसाट पुन्हा एकदा वादात सापडले... विरोधकांनी सत्ताधारी मंत्र्याच्या या अजब कारनाम्याचा समाचार घेतलाय.

दरम्यान विरोधकांनी केलेल्या चौफेर टीकेनंतर संजय शिरसाटांनी आता सारवासारव केलीय..उपोषणकर्त्याच्या मागणीवरुनच त्याला घरी बोलावलं होतं असं शिरसाटांनी म्हटलं.. तर उपोषणकर्त्यानं नेमकं काय म्हटलं पाहा..

शेतकऱ्यांबद्दल सत्ताधारी मंत्र्यांचा आणि नेत्यांचा असंवेदनशीलपणा अनेकदा समोर आलाय... त्यातच आता शिरसाटांनी थेट उपोषणकर्त्यांला घरी बोलून उपोषण सोडण्यास सांगितल्यानं या अजब पॅटर्नची राज्यभर चर्चा आहे.. अतिवृष्टीनं आधीच शेतकरी पार कोलमडून प़डलेला असताना दुसरीकडे सत्ताधारी मंत्री आणि नेत्यांचे हे वागणं शोभनीय आहे की शोभा काढणारं आहे हे याचा विचार नेत्यांनी करायलाच पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं झालं स्वस्त! १० तोळ्यामागे ८२०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Municipal Elections Voting Live updates : अकोल्यात खळबळ! एकाच प्रभागातील २५ ते ३० लोकांचे मतदार यादीतून नाव गायब

मोठी बातमी! महिलेचे मत गेले चोरीला, बोगस मतदानाचा आरोप, मुंबईच्या १४६ क्रमांच्या वॉर्डात नेमकं काय झालं?

राजकीय संघर्ष पेटला! काँग्रेस उमेदवाराचे कार्यालय जाळले, भाजपवर आरोप|VIDEO

Spa Centre : २० मुलींसोबत एकच मुलगा, स्पा सेंटरमध्ये नको तो धंदा, मसाज सर्व्हिसच्या नावाखाली...

SCROLL FOR NEXT