नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने नाशिक (Nashik) शहरात आज सामूहिक राष्ट्रगायनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या समारोपावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी हजेरी लावली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. कारण, मुसळधार पाऊस सुरू होता आणि विद्यार्थी पावसात भिजत होते, त्याचवेळी रावसाहेब दानवे मात्र छत्रीखाली उभे होते. (Raosaheb Danve Latest News)
विशेष बाब म्हणजे, रावसाहेब दानवे यांच्यासाठी छत्री धरण्यासाठी एक व्यक्तीही तिथे हजर होता. त्यामुळे मंत्रीसाहेब छत्रीत आणि विद्यार्थी भरपावसात भिजत आहे. असंच चित्र यावेळी पाहायला मिळालं. पावसात भिजणाऱ्या विद्यार्थ्यासाठी तात्पुरतं छप्पर उभारण्याची तसदी एकाही सरकारी अधिकाऱ्याने घेतली नाही. जेव्हा विद्यार्थी भर पावसात भिजत होते. तेव्हा दानवे आणि इतर अधिकारी मात्र छत्रीचा आसरा घेत होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने नाशिक शहरात आज सामुहिक राष्ट्रगायनाचा कार्यक्रम होता. यावेळी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, नाशिक महानगर पालिका आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने संयुक्तरित्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सामूहिक राष्ट्रगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Raosaheb Danve Nashik News)
सकाळी साडेसात ते साडेनऊ दरम्यान ढोल ताशांचा गजर तसेच लेझीम खेळत हातात तिरंगा घेऊन शहरातील अनेक भागातून रॅली काढत विविध शाळांचे हजारो विद्यार्थी मैदानावर पोहोचले होते. कार्यक्रमाच्या समारोपावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हजेरी लावत स्वातंत्र्यदिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, भर पावसात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे तुफान हाल झाले, अनेक विद्यार्थी पावसात भिजत होते तर दुसरीकडे रावसाहेब दानवेंसह वरिष्ठ शासकीय अधिकारी मात्र छत्रीखाली होते. त्यामुळे दानवे साहेब छत्रीत आणि विद्यार्थी भर पावसात भिजताहेत असंच चित्र नाशिक शहरात पाहायला मिळालं.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.