Milk Price Saam tv
महाराष्ट्र

Milk Price: येवल्यात मुख्यमंत्री, उपमुख्यत्र्यांचा फोटोला दुग्धाभिषेक; धाराशिवमध्ये रस्त्यावर ओतले दूध

Dharashiv Yewla News : गाईच्या दुधाला प्रति लिटर ५० रुपये आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ७० रुपयांचा भाव देण्यात यावा

साम टिव्ही ब्युरो

धाराशिव : दुधाला हमीभाव मिळावा यासाठी राज्यातील काही भागात आंदोलन सुरु आहे. परंतु सरकारकडून अद्याप निर्णय झाला नाही. याचा निषेध करत (Dharashiv) धाराशिव येथे स्वराज्य पक्षाच्यावतीने तर (Nashik) नाशिकच्या येवला येथे प्रहार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले.  (Live Marathi News)

धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात स्वराज्य पक्षाच्यावतीने दुधाला हमीभाव (Milk Price) देण्यात यावा, त्याचबरोबर गाईच्या दुधाला प्रति लिटर ५० रुपये आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ७० रुपयांचा भाव देण्यात यावा. चारा डेपो चालू करावा. यासह विविध मागण्यांसाठी लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावरती दुध ओतून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी स्वराज्य पक्षाचे राकेश उंद्रे, सौरभ सुकाळे, अक्षय चेडे, शंभू गायकवाड, गणेश नलवडे यांच्यासह स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हमीभावासाठी प्रहार संघटनेचे आंदोलन
सध्या दुध दरवाढीच्या प्रश्नावरुन शेतकरी आक्रमक होत असून ढासळत्या दूध दराबाबत प्रहार संघटनेतर्फे नाशिकच्या येवला तालूक्यातील एरंगाव येथे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्री यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालत अनोखे प्रतिकात्मक आंदोलन करत सरकारचा निषेध केला. दुधाला २५ रुपयांचा दर मिळत असून दुष्काळी परिस्थिती, महागलेला चारा, वाढलेले पशुखाद्याचे दर यामुळे उत्पादन खर्च भरुन निघत नसल्याने सरकारने दुधाच्या दरात वाढ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

Maharashtra News Live Update: वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोनं इतक्या रुपयांनी वाढलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

SCROLL FOR NEXT