Minister of State for Home Affairs Ajay Mishra, Ratnagiri saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri : 'उद्धव ठाकरे देव नाहीत, ते सांगताहेत ते सर्व खरं नाही'

बिहारमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती. त्यांचा मुख्यमंत्री बनवला असताना जनता दलानं आम्हांला धोका दिला असे मिश्रा यांनी नमूद केलं.

अमोल कलये

Ajay Mishra : गेल्या निवडणुकीनंतर भाजपला शिवसेनेनी धोका दिला. त्याचं फळ सेनेला आत्ता मिळाला आहे. आगामी काळात (सन २०२४) विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपचा माेठा विजय हाेईल असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी रत्नागिरी (ratnagiri) येथे नमूद केले. (Ratnagiri Latest Marathi News)

स्वार्थांसाठी आघाडी सरकार अस्तित्वात

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा म्हणाले उद्धव ठाकरे काही देव नाहीत. ते सांगतायत ते सर्व खरे नाही. भाजपला सेनेनी धोका दिला. आम्ही आधीपासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढणार असं सांगितले होते. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांनी स्वतःच्या स्वार्थांसाठी आघाडी सरकार अस्तित्वात आणलं असेही मिश्रा यांनी नमूद केले.

काॅंग्रेसवर शरसंधान

आठ वर्षात ईडीने एक लाख करोड पेक्षा जादा संपत्ती आणि कॅश जप्त केली आहे. ईडी सोनिया आणि राहूल गांधी यांची चौकशी करीत आहे. यंग इंडिया नवीन कंपनी बनली गेली आणि त्यामाध्यमातून काॅंग्रेस पक्ष या कंपनीचे कर्ज माफ करत आहे. पाच हजार करोड रुपये थेट राहूल गांधी आणि सोनिया यांना देण्याचे काम काॅंग्रेसनं केलं. न्यायालयाच्या आदेशावरून ही चौकशी सुरु असल्याचं मत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी दिली.

सरकार रिफायनरीसाठी प्रयत्न करेल

याआधीच्या सरकारने रिफायनरीसाठी जमीन दिली नाही. आात आमचं सरकार महाराष्ट्रात आलंय. त्यामुळे आमचं सरकार रिफायनरीसाठी नक्की प्रयत्न करेल असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केला. सन २०२४ मध्ये विधानसभा आणि लोकसभेत भाजपचा माेठा विजय हाेईल असेही मिश्रा यांनी नमूद केले.

संजय राऊत यांची नगरसेवक हाेण्याची पात्रता नाही

संजय राऊत यांची नगरसेवक म्हणून निवडून येण्याची पात्रता नाही. त्या माणसाला आम्ही सोबत का घेऊ असं टाेला मिश्रा यांनी राऊत यांनी लगावला. भाजपात कुणी चुकीचं काम करणारा असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असंही मिश्रा यांनी म्हटलं

शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला

महाराष्ट्रात शिवसेना भाजपसोबत लढली होती. सेनेच्या नेत्यांनी भाजपला साथ दिली होती. त्यावेळी काँग्रेस विरोधात जनतेनं मतदान केलं. मात्र शिवसेनेने विश्वासघात केला. पाठीत खंजीर खुपसला. जनादेशाच्या विरोधात सेनेने सरकार बनवलं. त्यांच फळ त्यांना मिळालं. बिहारमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती. त्यांचा मुख्यमंत्री बनवला असताना जनता दलानं आम्हांला धोका दिला असे मिश्रा यांनी नमूद केलं.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुक्ताईनगरातील उमेदवारांना 'झेड प्लस' सुरक्षा द्या: एकनाथ खडसे

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT