Latur News : अंबाजोगाई रोडवर बॉम्बच्या अफवेने एकच खळबळ !

पोलिस आणि राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी यांची मोठी तारांबळ उडाली.
latur
latursaam tv

लातूर : शहरातील अंबाजोगाई रोडवरील राज्य परीवहन महामंडळाच्या (msrtc) विभागीय कार्यशाळेच्या प्रवेशद्वाजवळ सापडलेल्या बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने आज (शनिवार) एकच खळबळ उडाली होती. ही अफवा शहरात वार्‍यासारखी पसरताच घटनास्थळी शिवाजी नगर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि बॉम्बशोधक आणि श्वान पथकही दाखल झाले. (Latur Latest Marathi News)

या पथकाने सदर बेवारस बॅगची तपासणी केली असता या घटनेचा खुलासा झाला. त्या बेवारस बॅगमध्ये बॉम्ब किंवा अन्य स्फोटक वस्तू काहीच नव्हते तर चक्क कपड्याच्या चिंध्या भरलेल्या आढळून आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.

latur
Ambadas Danve : शिंदे-फडणवीस सरकारनं पुसली शेतक-यांच्या तोंडाला पाने : अंबादास दानवे

दरम्यान पोलिस आणि राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी यांची मोठी तारांबळ उडाली.

Edited By : Siddharth Latkar

latur
Nana Patole : काॅंग्रेस मित्रांना दगा देत नाही; भाजपसह नाना पटाेलेंचा मित्र पक्षास टाेला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com