Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

राज ठाकरेंनी भोंगे उतरवण्याऐवजी...; राज्यमंत्र्यांचा टोला

केंद्र सरकार कोळशाचा पुरवठा करत नाही म्हणून राज्यावर लोडशेडिंगचे संकट उभे झाले आहे, असा आरोपही तनपुरेंनी केला.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: राज ठाकरे यांनी भोंगे उतरविण्याच्या मागणीपेक्षा केंद्राकडे कोळसा आणि पेट्रोलचे (Petrol) दर कमी करण्याची मागणी केली पाहिजे, असा टोला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज ठाकरे यांना लगावला. राज ठाकरे कोणाची तरी दलाली करत आहेत. केंद्र सरकार कोळशाचा पुरवठा करत नाही म्हणून राज्यावर लोडशेडिंगचे संकट उभे झाले आहे, असा आरोपही तनपुरेंनी केला. पण राज ठाकरे यांना हे विषय दिसत नाहीत. ते अधूनमधून जागे होतात, म्हणून त्यांना लोकांचे प्रश्न कळत नाहीत, असा टोलाही त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला.

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यात उत्तर सभा घेवून राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका केली. व राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा दिला. यावरुन राज ठाकरे व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरु आहे.

आज ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांनी आज चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला भेट दिली. राज्यातील वीज भारनियमनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील कोळसा साठ्याची त्यांनी पाहणी केली. महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी कोळसा संकटविषयी त्यांना माहिती दिली. राज्यातील वीज संकट महाविकास आघाडी सरकार तारेवरची कसरत करत सांभाळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रापेक्षा देशातील अन्य राज्यांमध्ये वीज भारनियमनाची स्थिती बिकट असल्याचेही ते म्हणाले. देशातील सर्व राज्यांना कोळसा पुरवठा केंद्र सरकारद्वारेच होतो हे त्यांनी लक्षात आणून दिले.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT