Gulabrao Patil on Raj Thackeray SaamTvNews
महाराष्ट्र

ऋतूंप्रमाणे बदलतात राज ठाकरेंचे विचार; कधीच नसतात एका मतावर ठाम - गुलाबराव पाटील

राज ठाकरे यांनी आपला एक मुद्दा कायम ठेवावा, कारण भरकटणारी नाव कधीच नय्या पार करू शकत नसल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव : राज ठाकरे यांचे विचार ऋतू बदलतात त्या प्रमाणे बदलत असतात ते कोणत्याही एका विचारावर ठाम राहत नाहीत अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली आहे. तसेच राज ठाकरेंनी एका विचारावर ठाम राहायला हवे असा सल्लाही पाटील यांनी दिला. राज ठाकरे (Raj Thackeray) कधी परप्रांतीयांचा मुद्दा उचलला, नंतर हेच परप्रांतीय भारतीयच असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी मराठीचा मुद्दा सोडला. त्यानंतर पुन्हा त्यांनी मराठी मुद्दा पुढे आणला मात्र त्यात त्यांना पाहिजे तसे यश मिळाले नसल्याने आता त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. (Gulabrao Patil on Raj Thackeray)

हे देखील पहा :

मागील काळात राज ठाकरे यांची भाषणे ही काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) पक्षाला सपोर्ट करणारी आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यावर टीका करणारी असल्याचं पाहायला मिळाले होते. काही सांगता येत नाही पुढील सहा महिन्यात अजून ते काय पुढे आणतील, त्यांचे विचार नेहमी ऋतू बदलावे तसे राहिले असून मनसे आणि राज ठाकरे यांचे सातत्याने बदलणारे विचार पाहता पक्ष आणि ते दिशाहीन झाल्याचं वाटत आहे. ज्यांच्या कडे दिशा असते ते कधीच आपली ध्येयधोरणे बदलत नसतात, मनसेला यश मिळत नसल्याने पुन्हा त्यांनी शिवसेनेच्याच हिंदुत्वाचा मुद्दा पकडला असल्याची बोचरी टीकाही गुलाबराव पाटलांनी केली.

राज ठाकरे यांनी सातत्याने आपल्या भूमिका बदलू नये, त्यांच्या सारख्या नेत्याला हे शोभत नाही. मरेपर्यंत कोणत्यातरी एका भूमिकेवर त्यांनी ठाम राहायला हवे. शिवसेनेवर टीका केल्याशिवाय कोणाचं पोट भरत नाही. अनेक जण शिवसेना (Shivsena) सोडून गेले मात्र जे गेले त्यांची काय अवस्था आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपला एक मुद्दा कायम ठेवावा ,कारण भरकटणारी नाव कधीच नय्या पार करू शकत नसल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT