Dada bhuse and Aaditya Thackeray Meet Saam tv
महाराष्ट्र

Dada bhuse and Aaditya Thackeray Meet: मोठी बातमी! नाशकात मंत्री दादा भुसे आणि आदित्य ठाकरेंची गुप्त भेट? चर्चांना उधाण

Vishal Gangurde

तबरेज शेख

Nashik News: नाशिकमधून मोठी राजकीय वृत्त हाती आलं आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एका खासगी रिसॉर्टवर भेट झाल्याची माहिती मिळत आहे. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एका खासगी रिसॉर्टवर भेट झाल्याची माहिती आहे.

आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी दादा भुसे अचानक नियोजित कार्यक्रमातून बाहेर पडले. एका शैक्षणिक संस्थेच्या सुरू कार्यक्रमातून भुसेंनी प्रशासकीय प्रोटोकॉल बाजूला ठेवत रिसॉर्ट गाठलं.

आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांची भेट झालेलं रिसॉर्ट बेजे गावातील आहे. प्रशासकीय दौरा नसताना भुसे अचानक मालेगाववरून नाशिकला आले होते.

आदित्य ठाकरेंचा नाशिक दौरा खासगी असल्याची सुरुवातीला माहिती होती. आदित्य ठाकरे स्वतः गाडी चालवत नाशिकला आले होते. आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांच्या भेटीची मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळण्यात आल्याची माहिती आहे.

तत्पूर्वी, मंत्री दादा भुसे यांच्या गुप्त भेटीवर शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'एखादी व्यक्ती समोरून आली आणि आम्ही भेटलो, तर त्यात काय? योगायोग असू शकतो. त्याला राजकीय नजरेने का पाहावं? असं प्रश्न करत सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

Maharashtra News Live Updates: तुळजापूर बोगस मतदान नोंदणी अर्ज प्रकरणाला राजकीय वळण

Shirdi Saibaba : साई चरणी ६८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा ब्रोच अर्पण

SCROLL FOR NEXT