bacchu kadu  saam tv
महाराष्ट्र

गुवाहाटीतून मंत्री बच्चू कडू करताहेत अकोल्यातील नागरिकांची कामे; चर्चांना उधाण

महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सरकार वाचवण्यासाठी कामाला लागले आहेत. मात्र, दुसरीकडे पालकमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांच्याकडून गुवाहाटीतून अकोल्याच्या कार्यालयात नियमितपणे नागरिकांची कामे करण्यात येत आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे. त्यामुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गट अशी उभी फूट पडली आहे. त्यामुळे महाविकास कोसळणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सरकार वाचवण्यासाठी कामाला लागले आहेत. मात्र, दुसरीकडे पालकमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांच्याकडून गुवाहाटीतून अकोल्याच्या कार्यालयात नियमितपणे नागरिकांची कामे करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ( bacchu kadu latest News In Marathi)

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचा झेंडा फडकविल्याने राज्यातील घडमोडींना वेग आहे. शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील बंड पुकारून एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहे. सध्या ते गुवाहाटीत आहेत. मात्र, गुवाहाटीतून कडू हे पालकमंत्री असलेल्या त्यांच्या अकोल्यातील कार्यालयात नियमितपणे नागरिकांची कामे करण्यात येत आहेत. बच्चू कडू हे त्यांचे स्वीय सहायक दीपक ठाकरे यांच्या संपर्कात असून नागरिकांची कामे करण्यात येत आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे सुद्धा बंडखोर आमदारांसोबत असल्याने सत्तांतर झाल्यास त्यांचे सरकारमधील नेमके स्थान काय असेल, मंत्रीपद मिळाले तरी ते अकोल्याचे पालकमंत्री कायम राहतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी पालकमंत्री कार्यालयातील कामे मात्र नेहमीप्रमाणे सुरू आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह बंडखोरांना मिळणार नाही, नीलम गोऱ्हे यांचा इशारा

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून राज्याच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे. शिवसेनेचे चाळीस आमदार आणि अपक्ष १० असे एकूण ५० आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली असून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना नाव किंवा शिवसेनेचे चिन्ह मिळणार असे पसरवले जात आहे. मात्र, शिवसेनेची (Shivsena) घटना आहे. ती निवडणूक आयोगाच्या नुसार तयार केली आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह बंडखोरांना मिळणार नाही, असा इशारा नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT