मिरजेत किडनी प्रत्यारोपणाच्या बहाण्याने दहा लाखांचा गंडा! Saam TV
महाराष्ट्र

मिरजेत किडनी प्रत्यारोपणाच्या बहाण्याने दहा लाखांचा गंडा!

परशुराम उपरकर यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या.

विजय पाटील

सांगली : किडनी प्रत्यारोपणाच्या बहाण्याने परशुराम प्रभाकर उपरकर यांची नंदगोपाल चेन्नई, तमिळनाडू आणि व्यंकटेश राव उर्फ वेंकी अपोलो मेडिकल ऑफीस, हैद्राबाद या दोघांनी दहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या दोघांविरुद्ध परशुराम उपरकर यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परशुराम उपरकर यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. त्यामुळे ते किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी  मिरजेतील महात्मा गांधी चौकातील एका रुग्णालयात आले होते. त्या दरम्यान रुग्णालय परिसरात नंदगोपाल यांनी उपरकर यांच्याकडे गेले. त्यांनी उपरकर यांना स्वत: वैद्यकीय व्यावसायिक असून वैद्यकीय क्षेत्रात मोठमोठ्या डॉक्टरांची ओळख असल्याचे सांगितले. त्यानंतर नंदगोपाल यांनी विविध डॉक्टरांसोबत काढलेले फोटो तसेच प्रमाणपत्रे दाखवून उपरकर यांचा विश्वास संपादन केला.

नंदगोपालने विश्वास संपादन केल्यानंतर उपरकर यांना किडनी प्रत्यारोपण करण्यासंदर्भातील प्रक्रिया समजावून सांगितली. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी ५ लाख रुपये आगाऊ रक्कम द्यावे लागेल असे सांगून ५ लाख रुपये काढून घेतले. पैसे मिळाल्यानंतर नंदगोपाल याने व्यंकटेश राव याच्या मदतीने उपरकर यांची मिरज आणि विशाखापट्टणम येथे विविध तपासण्यांसह वैद्यकीय तपासणी केली. तपासण्या करण्याकरीता उपरकर यांच्याकडून आणखीन ५ लाख रुपये रक्कम दोघांनी काढून घेतली. परंतु किडनी प्रत्यारोपन प्रक्रिया मात्र पूर्ण झाली नाही.

दहा लाख रुपये देवूनही किडनी प्रत्यारोपनची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने उपरकर यांनी दोघांकडे पैसे परत करण्याची मागणी केली. परंतु दोघांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच उपरकर यांनी नंदगोपाल आणि व्यंकटेश राव उर्फ वेंकी या दोघांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास मिरज शहर पोलिस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Price Today : CNG च्या दरात मोठी वाढ, मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ; आजचे ताजे दर काय? वाचा

गणेशोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध; 'धार्मिक कार्यक्रमात गौतमीचा धांगडधिंगा कशाला?'

महाराष्ट्र हादरला! उपचाराच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; ठाकरेंच्या शिवसैनिकांनी डॉक्टरला बदडला, आरोपी गजाआड

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला, तुमच्या शहरात आज काय भाव?

SCROLL FOR NEXT