Milk Rates High News  AI Image
महाराष्ट्र

Milk Rate : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ; कुठे घेतला निर्णय? वाचा

Maharashtra Milk Rate Hike News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा दुग्ध संघाने दूध खरेदी दरात वाढ केली आहे. म्हशीचे दूध ४ रुपयांनी वाढले असून आता ५२ रुपये मोजावे लागणार, तर गाईचे दुध २ रुपयांनी वाढले असून ३९ रुपये प्रति लिटर दर मिळणार.

Alisha Khedekar

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संघाने गाई आणि म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ केली असून, यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

नवीन दरानुसार म्हशीच्या दुधाला आता प्रति लिटर ५२ रुपये मिळणार आहेत. यापूर्वी हा दर ४८ रुपये होता. म्हणजेच म्हशीच्या दुधाच्या दरात चार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर गाईच्या दुधाचा दरही ३७ रुपयांवरून ३९ रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. गाईच्या दुधासाठी शेतकऱ्यांना आता दोन रुपये अधिक मिळणार आहेत. शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळात आर्थिक मदत मिळावी आणि दूध व्यवसायातून त्यांना चांगले उत्पन्न मिळावे, या उद्देशाने ही दरवाढ करण्यात आल्याचे दुग्ध संघाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या निर्णयाचा परिणाम दूध संकलनावरही दिसून येत आहे. दीड महिन्यापूर्वी भंडारा जिल्हा दुग्ध संघाकडे दररोज केवळ १८ हजार लिटर दूध जमा होत होते. मात्र, दुधाचे दर वाढवल्यानंतर अनेक दूध उत्पादकांनी संघाला दूध देण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यात दूध संकलनात १० हजार लिटरची वाढ झाली आहे. आता संघाकडे दररोज २८ हजार लिटर दूध जमा होत आहे.

दुधाचे खरेदी दर वाढवल्यामुळे दुग्ध संघाला आर्थिक भार सहन करावा लागत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, संघाने दर वाढवल्याने खासगी दूध खरेदीदारांसमोरही स्पर्धेचे आव्हान निर्माण झाले आहे. शेतीला अडचणी येत असताना दूध व्यवसायातून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा दुग्ध संघाच्या या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना मिळणार हक्काची घरे

Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर, सुनेत्रा पवारांसह या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

Political News : इस्त्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ; नेतन्याहूंची सत्ता धोक्यात!

Health Tips: सतत हात-पाय थंड पडतात? शरीरातील 'या' ७ समस्या असू शकतात कारणीभूत!

Kitchen Vastu Tips: गॅस आणि सिंक एकाच ओट्यावर असणं अशुभ? वाचा वास्तुशास्त्राचा नियम काय सांगतो, उपायही जाणून घ्या

SCROLL FOR NEXT